कविता आणि iPhone
झाले किती आठवडे
झाले किती दीस
पाडून विचारांचा
आणि शब्दांचा कीस
केली नाही कविता
तुम्हासमोर सादर
प्रशंसेच्या मोहाला
घालू म्हटलं आवर
रिकामे डोके म्हणतात
असते सैतानाचे घर
माझ्या रिकाम्या डोक्यात
मात्र कवितेचा वावर
पूर्वी करायचो डोक्यावर
संगीताचा वर्षाव
डोके रिकामे रहायला
द्यायचोच नाही वाव
घेतला iPhone तेव्हापासून
बंद झाली आकाशवाणी
ऐकणे माझे बंद झाले
मोकळ्या वेळी गाणी
सकाळी चालताना
मग करायचे काय?
डोक्यातल्या विचारांना
फुटले कवितेचे पाय
iPhone च्या Notes मधे
नोंदायला लागलो कडवी
सुचतील जशी डोक्यात
असेनात का आडवी तिडवी
त्यातल्या एखाद्या कडव्याला
फुटू लागले धुमारे
जमू लागले त्याभोवती
विचार, शब्द सुसंगत सारे
केल्यावर कडव्यांवर त्या
थोडेफार संस्कार
हळूहळू कविता त्यातून
घेऊ लागली आकार
आयता वाचकवर्ग होता
Whatsapp चे group
प्रतिसादाने तुम्हा मित्रांच्या
मिळाला मजला हुरूप
आठवड्या पंधरवड्यामागे
सतत केल्या कविता सादर
जे जे आले जसे मनात
धरून त्या विषयांचा पदर
कविता आणि iPhone चा
संबंध असा बादरायण
संगीताचा विरह ठरले
कविता प्रेमाचे कारण
अज्ञात मानवा काय वाढले
आयुष्याच्या कुठल्या वळणावर
शक्य आहे काहीही जर
बनला कवी पन्नाशीत विद्याधर
Comments
Post a Comment