कला - मूर्त आणि अमूर्त

मान्य मला कलेस बंधन
नको शास्त्र, अन् नियमांचे
आवडे कला जरी पारंपारिक
वावडे नसे मज नवतेचे 

अनुभव कल्पना अथवा विचार
कला माध्यम अभिव्यक्तीचे
कलाकृतीचे हेच प्रयोजन
अभिप्रेत जे ते पोचवण्याचे

जरी असे मी कला पुजारी
आकर्षण मजला मूर्ताचे
अमूर्तासही देव मानण्या
नसे ह्रदय मम भक्ताचे

बोध होइना कोणाही ज्यातून
कलेवर केवळ ते कलेचे
मनात उमटे ना संवेदना
कला अशी घर वेदनेचे

रहस्यात अशा काय गंमत
होई ना अखेर ऊलगडा
कलाकृती त्या गढूळ पाणी
आणि विद्याधर पालथा घडा

१८ एप्रिल २०१६

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis