Date of Expiry
जन्मताच माणसाला जर
कळली date of expiry
होईलका मनाची
मरणासाठी पूर्वतयारी
बघून मोजमाप
आयुष्याच्या दोरीचे
देऊ दोष की
मानू
आभार नशिबाचे
होईल का सोपे
आयुष्य आखणे
का होईल अवघड
आनंदाने जगणे
होऊ कार्यरत
जास्त जोमाने
की सोडून प्रयत्न
जगू दैव दयेने
मृत्यूच्या जाणीवेने
होऊ जबाबदार
की त्याच्या अटळतेने
वागू बेदरकार
काढू का आयुष्य
आपण रडत कुढत
की मृत्यूलाही जाऊ
सामोरे हसत हसत
पटेल का अस्तित्व
आहे प्रारब्धाचे
कळेल का महत्व
याजन्मीच्या कर्माचे
असली किंवा नसली
मृत्यूची तारीख माहित
आहे मृत्यू अटळ
सत्य त्रिकालाबाधित
धरून एखादी तारीख
मृत्यूची आपल्या गृहित
आयुष्याची वाटचाल
तुम्ही ठरवा उर्वरित
पूर्ण करण्या सर्व कदाचित
मृत्यू देणार नाही उसंत
पण प्रयत्नच केला नाही
याची राहणार नाही खंत
पटो अथवा ना
पटो
विचार जरूर करा
केलीत मात्र यादी
तर कळवा विद्याधरा
Comments
Post a Comment