साधना व सिद्धी
साधनेच्या मार्गावरती
मैलाचे दगड सिध्दी
रचले बहुधा इंद्राने
पथभ्रष्ट करण्या बुध्दी
संतपदाला पोचती
मिळता काही सिध्दी
पाठीवर तिच्या जन्मती
पैसा आणि प्रसिध्दी
संताच्या मागे मग
लोटे
अनुयायांची गर्दी
भक्तांच्या या गर्दीमधे
माशीला होई सर्दी
शिंके माशी मार्गावरती
साधना रहाते अर्धी
नारद देइ इंद्राला
ही आनंदाची वर्दी
भक्तांच्या या महापुरी
बुडती जे हे
संत
अवडंबर अन बडेजाव
त्या पडू लागती
पसंत
सिध्दींचाही होई ऱ्हास
संतांचे होती असंत
सन्मार्गाचा प्रवास करण्या
मिळत नाही त्या
उसंत
सांगून गेले म्हणोनि
समर्थ
त्यांसी जो असे
मार्गस्थ
करा दुर्लक्ष वाटेवरल्या
सिध्दींकडे तुम्ही समस्त
दिसती रोज अवतीभवती
असे ढोंगी बाबा अन
संत
चहुकडे पसरले तयांचे
लाखो अनुयायी व भक्त
नको साधना नको सिध्दी
अन नको व्हायला
भक्त
हसत जगावे संसारातच
होउनिया मनमुक्त
हास्यरसाचे तुषार उडवा
वदुनी विनोद खट्याळ
तत्व पाळतो हे विद्याधर
मग म्हणोत समर्थ टवाळ
५ एप्रिल २०१६
Comments
Post a Comment