गुडघे आरती
दुर्गे दुर्गट भारीच्या चालीवर
वाचा -
सर्जरीचा महिमा, वर्णिला कीती
म्हातारेही म्हणे, पळू लागती
बायको म्हणते काय, ठेवलेय डोंगरी
झेपत नाही तर बसा, गुपचूप घरी
आम्हाला केवळ, तुमचाच आधार
तुमच्याशिवाय उघडी, पडतील ना पोरं
डोंगराची साद येता तरी, लागते हूरहूर
मित्रांची संगत, जशी दुधात साखर
मनस्थिती द्विधा, निर्णय दुर्धर
देवा करतो धावा, तुझा सत्वर
गुडघे दुखती भारी, डोंगर उतारी
डॉक्टर सांगती करा, लवकर सर्जरीसर्जरीचा महिमा, वर्णिला कीती
म्हातारेही म्हणे, पळू लागती
हा गुडघा तो गुडघा दुखतो निशिदिनी
आणेल का जावोनी कोणी संजीवनी
हा गुडघा तो गुडघा
मित्र निघाले आहेत, किलीमान्जारी
म्हणती अनुभव हा, आहे लय भारी
बायको म्हणते काय, ठेवलेय डोंगरी
झेपत नाही तर बसा, गुपचूप घरी
हा गुडघा तो गुडघा .....
जाता तुम्ही लावूनी, जीवास घोर
म्हातारपणी करू नये ही थेरं आम्हाला केवळ, तुमचाच आधार
तुमच्याशिवाय उघडी, पडतील ना पोरं
हा गुडघा तो गुडघा .......
आवडत नाही मजला, जरी ही कुरबूर
आहे म्हणण्यात या, तथ्य थोडेफारडोंगराची साद येता तरी, लागते हूरहूर
मित्रांची संगत, जशी दुधात साखर
हा गुडघा तो गुडघा .......
किती खाता किती बोलताचा, सतत गजर
अवतीभवती पसरे, निसर्ग सुंदरमनस्थिती द्विधा, निर्णय दुर्धर
देवा करतो धावा, तुझा सत्वर
हा गुडघा तो गुडघा .......
१७ जानेवारी २०१६
१७ जानेवारी २०१६
फारच छान...तू कवि केव्हापासून झालास?
ReplyDeleteजानेवारी २०१६ मधे लिहिलेल्या याच कवितेपासून!
ReplyDelete