बहावा
तुला पाहते च्या चालीवर वाचा
तुला पाहू का
मी
त्याला पाहू ग
नको त्यापुढे तू
उभी राहू ग
फुलांनी बहरला
असे तो बहावा
तू असता समोरी
कसा मी पहावा
बहाव्या तुझाकी
हो वाटेल हेवा
तुला पाहू का
मी .....
बहरले फुलांचे
जसे घोस पिवळे
पसरले बटांचे
तुझ्या गाली जाळे
बहाव्यातही मी
तुला पाहतो ग
तुला पाहू का
मी .....
तुझी माझी प्रीत
असे ही युगाची
बहाव्याप्रती का
भीती मग फुकाची
बहर हा फुलांचा
किती तो टिकेल
तुला पाहू का
मी .....
तू ये ना
जराशी
माझ्या बाहूपाशी
बहाव्याच्या पाहू
फुलांच्या या राशी
नयनी टिपावा नी
ह्रदयी फुलावा
तुला पाहू का
मी .....
१९/०५/२०१६
Comments
Post a Comment