खजिना प्रेमाचा
नकळत त्यांच्या
किती किशोरी
उतरल्या माझ्या
मन मंदिरी
हळूच अन् मग
एक सुंदरी
शिरली थेट
की हो गाभारी
दाबावी कळ
चुकून एक अन्
अचानक उघडावा
चोरकप्पा खळ्कन
जावे दिपून
तेजाने नयन
खजिन्याचे अन्
होता दर्शन
तसेच काहीसे
माझे घडले
नव भावनांचे
दार उधडले
भांबावले मन
अश्रध्दापरि
जया अचानक
दर्शन घडले
भावगीतांतील
शब्दांमधले
अर्थ अचानक
मज उलगडले
नव्हती कल्पना
त्याची मजला
खोल मनामधे
होते जे दडले
दगडाच्या या
माझ्या ह्रदयाला
भावनांचे नवे
पाझर फुटले
मित्र मला
मग ते आठवले
अनुभव हा
होते मज वदले
हसून केली
चेष्टा ज्यांची
होते त्यांना
मी हिणवले
प्रकरणास त्या
गौण असे मग
वळण कसे
कोणते लागले
ठाम नसावा
समज कोणता
कोणा ठावे
पुढे काय मांडले
Comments
Post a Comment