गुडघे आरती

दुर्गे दुर्गट भारीच्या चालीवर वाचा -  



गुघे दुखती भारी, डोंगर उतारी
डॉक्टर सांगती करा, लवकर सर्जरी
सर्जरीचा महिमा, वर्णिला कीती
म्हातारेही  म्हणे, पळू लागती


हा गुघा तो गुघा दुखतो निशिदिनी
आणेल का जावोनी कोणी संजीवनी


हा गुघा तो गुघा

मित्र निघाले आहेत, किलीमान्जारी
म्हणती अनुभव हा, आहे लय भारी
बायको म्हणते काय, ठेवलेय डोंगरी
झेपत नाही तर बसा, गुपचूप घरी

हा गुघा तो गुघा .....

जाता तुम्ही लावूनी, जीवास घोर
म्हातारपणी करू नये ही थेरं
आम्हाला केवळ, तुमचाच आधार
तुमच्याशिवाय उघडी, पडतील ना पोरं

हा गुघा तो गुघा .......

आवडत नाही मजला, जरी ही कुरबूर
आहे म्हणण्यात या, तथ्य थोडेफार
डोंगराची साद येता तरी, लागते हूरहूर
मित्रांची संगत, जशी दुधात साखर

हा गुघा तो गुघा .......

किती खाता किती बोलताचा, सतत गजर
अवतीभवती पसरे, निसर्ग सुंदर
मनस्थिती द्विधा, निर्णय दुर्धर
देवा करतो धावा, तुझा सत्वर

हा गुघा तो गुघा .......

१७ जानेवारी २०१६

Comments

  1. फारच छान...तू कवि केव्हापासून झालास?

    ReplyDelete
  2. जानेवारी २०१६ मधे लिहिलेल्या याच कवितेपासून!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis