साहित्यातली मिरासदारी

.मां.च्या दमानं
वाटलं घ्यावं दमानं
कविता गुंडाळून बासनात
बसावं गप गुमान

मन मात्र माझं
करून उठलं बंड
का ऐकायचं यांचं
झाली म्हातारी जी धेंडं

पुरे झाली यांची
साहित्यातली मिरासदारी
निघालेत आता करण्या
जे कविंची खानेसुमारी

वय झालंय यांचं
द्यायचं आशीर्वचन
पोटात दुखतय यांच्या
होउन कवितांचे अपचन

कवितेच्या शेतात
असतीलही तण
फोफावतील तिथुनच
बहरणारे वृक्षपण

का निघालेत खुडायला
कोवळे सुकुमार कोंब
फुलण्याआधीच विरूध्द
त्यांच्या, का मारताय बोंब

पुरते काडी एक
सगळे शेत पेटवायला
होइल राख, लागेल ओले
सुक्याबरोबर जळायला

पेटवण्यापेक्षा काडी
घालावं खतपाणी
फुलेल त्यातूनच
कविता गोजिरवाणी

आहे हक्क बुजुर्गांना
नाराजी व्यक्त करण्याचा
करावी की खाजगीत
का हव्यास व्यासपीठाचा

घालत नाही भीक विद्याधर
असल्या पोकळ वास्यांना
असेल घर बडे तयांचे
किंमत ना त्यांच्या शब्दांना


२९ एप्रिल २०१६

Comments

  1. वर्तमानपत्रातील बातमी वाचून त्याला लगेच प्रत्युत्तरादाखल लिहिलेली कविता म्हणजे आधुनिक अग्रलेख लिहिल्या सारखे आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis