Posts

Showing posts from 2019

भिंती

भिंती आधीही होत्या पण मोजकेच होते पूर्वी रंगारी एखादाच नि:स्वार्थी तर बहुतेक स्वार्थी, पत्रकार व पुढारी सोयीनुसार सत्य लपवण्याची होती त्यांची तयारी सर्व भिंती रंगवायची होती त्यांच्याकडे मक्तेदारी मग झाली क्रांती सामान्यांच्या हाती आली रंगाची झारी प्रत्येकाला आपआपल्या वाट्याची भिंतही झाली जारी आपआपल्या आकलनाप्रमाणे जो तो चित्र चितारी विविधरंगी जरी काही विदारक तर काही विखारी अचानक पूर्वीच्या मक्तेदारांची उघडकीस आली चोरी तथाकथित बुध्दीवादी विचारवंताची उघडी पडली हुशारी आज त्यांनाच खुपू लागली झाल्यावर ही भिंत दुधारी असहिष्णुवादाची जिथे तिथे फुंकू लागलेत ते आता तुतारी ज्यांना ज्यांना सतावतो भिंतींचा हा नवीन रंग भारी थांबवावी करणे त्यांनी येता जाता या भिंतींची वारी ०२-०५-२०१९

प्रेमसोहळा

प्रेमासक्त गवळण राधा ग्रीष्मातील तृषार्त धरणी स्निग्ध भुकेला श्रीकृष्ण घन नीळ अवतरे गगनी बघताच एकमेकांना विरहाचा फुटतो बांध बरसतो होऊन पाऊस उधळतो प्रेम मृद्गंध भेटीची आस दोघांना मिलनाचा शुध्द हेतू पाऊस प्रेमाचा बनतो द्वैत अद्वैतातील सेतू चालतो चार महिने प्रेमाचा असा सोहळा तृप्तीची दाटते हिरवळ संपतो ऋतू पावसाळा २४-०८-२०१९

मद्य

एका दारूगुत्ता चालवणाऱ्याकडे मित्राने दारूची मागणी केली असता त्याने दिलेले उत्तर - मद्य मागसी माझ्या सख्या, परि मद्य बाटल्या रिकाम्या सडति घरी ! आजवरी काचेच्या पेल्यातूनी मद्य पाजिले तुला भरोनी, सेवा ही पूर्विची स्मरोनी करि न रोष सख्या, दया करी. नैवेद्यापुरती एकच चपटी अता मद्याची माझ्या गाठीं; मरणचाहूली ढोसावी ओठी बाळगी अंथरूणीं कशी तरी. तरूण वारुणिंची निर्लज्ज कुजबुज, पहिल्या धारेचे गूढ मधुर गुज संसारतापातून सुटका हवी तुज, मद्य गाळण्या परि बळ न करीं ! सडला रे सडला देह सखया ! यकृत सडले भिवविते हृदया, आता मद्याचे नाव कासया ? लागले नेत्र हे पैलतिरीं. - भारावलेले काळे (विद्याधर) १०/०६/२०१९ प्रेरणास्त्रोत : भा. रा. तांब्यांची अजरामर कविता मधु मागसी माझ्या सख्या, परि मधुघटचि रिकामे पडति घरी ! आजवरी कमळाच्या द्रोणीं मधू पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्विची स्मरोनी करि न रोष सख्या, दया करी. नैवेद्याची एकच वाटी अता दुधाची माझ्या गाठीं; देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणीं कशी तरी. तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज, वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज, संसाराचे मर्म...

जिम्मा

खेतो खलिहानो में ना पला बढा ना मिली विरासत में मुझे जमीं सरकारी कानूनों की है बडी कृपा ना खरीद सकता हूॅं मैं इसे अभी पानी की किल्लत थी बचपनसे जब मिलता था भरते थे बर्तन सभी देखे हो दिन ऐसे जिन लोगों ने जाया करने की हिम्मत क्या होगी कभी ना गया कभी मै जंगल जंगल और ना तोडे है मैने पेड कभी ना नदी नालों से मेरा पडा पाला ना किया प्रदूषित मैंने पानी फिर कैसे कहाॅं और क्यूॅं पेडों का नदी नालों का जिम्मा मै अपने सर लूॅं जब मूॅंगफली नही खाई मैंने बिखरे छिलकों को क्यूॅं मैं झेलू 14-04-2019

Daily Soap

Sometimes exciting sometimes drab Sometimes sad and sometimes fab Sometimes verbose sometimes silent Sometimes loving sometimes violent Every day of life is a fresh new episode Traverses familiar, sometimes unknown road It seems to be based on a loose script But actors improvise it and story may drift To please the spectator or a co-actor You may act against your true character Is actor himself the writer and director Or does TRP act as the main influencing factor Twists and turns is what makes it interesting If it was predictable wouldn’t it be boring Our life is also just like daily soap With happy ending is the only hope 09/04/2019

हव्यास

मधुर स्मृतींचे आकाश कटू आठवणींचे मेघ क्वचितच डोकावणारी आशेची सुवर्ण रेघ मनाच्या पटलावरती चालतो अखंड खेळ निरभ्र दर्शन क्षणभर काळोखी बाकी वेळ कितीही घाला फुंकर खो देती एकमेका सुखाच्या क्षणांवर मात करतो प्रसंग बाका सुखदु:खाप्रती असावी म्हणे दृष्टी कायम सम्यक आहे असा महात्मा कुणी की कल्पना केवळ भ्रामक? पडती प्रयास अपुरे का पडतो कमी अभ्यास? का सोडून द्यावा आता स्थिरचित्ताचा हव्यास? १९-०७-२०१९

जीवन की कश्ती

जीवन की कश्ती लहरे पल पल समय का सागर बहता कलकल रौद्र ये कभी तो कभी उत्छृंखल गहरा कही तो कही ये समतल किसको पता ये कब लेगा निगल चारों ओर फैला रंग बदलता जल तय कर दिशा अपना जीवन सकल लहरोंसे जूझें कोई हो ना हो सफल किस्मत पे भरोसा किसी का अटल लहरों के हवाले बहता रहे अविचल दूर कहीं छुपी है जन्नतसी धरातल तलाश में उसकी पडे है कुछ निकल कौन सही कौन गलत बाते ये अनर्गल हर एक की नजर मे हैं दूसरा पागल मौजसे लो मौज डर को करो तुम बेदखल वोही करो हरदम दिल जाए जिसमें बहल २९-०६-२०१९

काहिली काहिली

हो रब्बा कोई तो बताए च्या चालीवर! माझ्या काळजाची झाली काहिली काहिली तुला पहिल्यांदा होती जेव्हा मी पाहिली होत्या पाहिल्या किती या आधी यौवना मनी उचंबळली नाही कधी ही भावना याला काय म्हणू मी ही नव्हे वासना झाले मला काय ते माझे मला कळेना सदा वावरते भवती तुझी स्वप्नसावली विचारांनी तुझ्या आता माझी झोप उडवली होती वाटली मला जी कवी कल्पना अनुभवली स्वत: मी गोड ती वेदना कधी गोड शिरशिरी तर कधी यातना रोज उमटते मनी नव संवेदना माझ्या ह्रदयाची तार तूच झंकारली बघता वाजते सतार माझ्या कानी सुरीली असतो उतावीळ मी रोज तुज दर्शना जीव भांड्यात पडतो होता पुरी कामना नक्की रोग कोणता या कसल्या खाणाखुणा प्रेमाने पछाडलो का झालो मी दिवाणा हो वैद्य आणि तू तपास माझी ख्यालीखुशाली होकाराचा दे उतारा स्वत: वा उलटटपाली २३-०४-२०१९

* जन्मा ही तुझी कहाणी

बऱ्याच जणींना नीट निरखून निवडली असेल तिला पारखून जिंकली असतील सौंदर्याने घरातल्या सर्व जणांची मने करून व्यवहाराची बोलणी मुहुर्त ठरला असेल शुभशकुनी हारतुरे लेवून वाजतगाजत झालं असेल तिचं घरी स्वागत नीट वागवण्याच्या आणा भाका तिच्याबरोबर मारण्या फेरफटका डौलाने रस्यावर फिरताना वळल्या असतील लोकांच्या माना शेजारी पाजारी पसरता ख्याती अभिमानाने असेल फुलली छाती कानामागुनी मग कुणी अवतरली अन् बघता बघता तिखट झाली दुर्लक्षाची ती शिकार झाली होती नव्हती ती रयाच गेली असते अताशा पडुनी खितपत कौतुकभरल्या हाताच्या प्रतीक्षेत न्हाऊमाखू घालेल कधी कुणी करेल कुणीतरी तेलपाणी आशेवर जगते ती केविलवाणी * जन्मा ही तुझी कहाणी ०९-०४-२०१९

घर

रांगोळीनं सजलेल अंगण मधोमध तुळशी वृंदावन बहरलेली फुलबाग परसदारी झोपाळ्यावर झुलणारी ओसरी मजबूत दगडी भिंतींचे रिंगण नाजूक पडद्यांना खिडक्यांचे कोंदण नव्याने शाकारलेलं कौलारू छत वाटेतलं सुंदर सुबक घर चित्रवत पाहिले किती उन्हाळे पावसाळे आणि सोसली किती वादळे तरीही होते उभे उजळ माथ्याने रोज सजावे जसे एखाद्या सौभाग्यवतीने काय झाले अचानक कुणास ठाऊक पण बघून आजचे स्वरूप झालो मी भावूक रांगोळी गेली होती विस्कटून तुळशी सुध्दा गेली होती सुकून फुलझाडांनी टाकली होती मान तिरडीगत झोपाळा आणि शांतता स्मशान भिंतीवर चढलेलं हिरवं शेवाळं खिडकीत गुंफलेलं कोळ्याचं जाळं काळवंडलेलं कौलारू छत सुंदर असणारं घर होतं मृतवत काय असेल घडलं होतं कोडं मला पडलं चौकशीअंती कळलं प्रेमाला संशयानं गिळलं घर होतं शाबूत पण चैतन्य हरवलं शरीर होतं जिवंत पण मन उन्मळलं १४-०३-२०१९

नशा

भक्ती भावे चिंब भिजून कुणी करतो कुंभ स्नान पंढरपूरची वारी करतो कुणी विठुचे घेण्या दर्शन थंड सागरी पोहून पोहून कुणी जातो खाडी ओलांडून धाप लागते तरी धावतो अर्धी कुणी पुरी मॅरेथाॅन कुणी मारतो बुडी खोल अन् सागरतळ काढे खंगाळून गाठती कुणी उन्नत शिखरे करून जगभर गिरीभ्रमण कुणी हरवतो शब्दांमधे अन् सुरात होई कुणी अंतर्धान कुणी काढतो चित्रे बहुरंगी नर्तनात होई कुणी रममाण अहोरात्र करी कुणी संशोधन प्रगत होती शास्त्रं, विज्ञान जोश उत्साह अंगात भरून कुणी खेळात गाजवी मैदान कुणी धावतो मिळवण्या धन जरी ओथंबती घरी रांजण प्रसिध्दीसाठी करतो कुणी लटके प्रेम लटकेच भांडण जीवघेणे त्यांचे कट, कारस्थानं सत्तेसाठी करतो कुणी राजकारण गांजलेल्यांना कुणी देतो संजीवन सेवेसाठी करतो जीवन अर्पण पशुपक्षी वन्यजीवसंरक्षण कुणा जगण्या पुरते हे कारण वनराईचे करण्यासाठी रक्षण कुणी छेडतो चिपको आंदोलन प्रत्येकाची दशा वेगळी प्रत्येकाची दिशा वेगळी कुणी हसावे कशा कुणाला प्रत्येकाची नशा वेगळी २६/०१/२०१९

ख्वाहिशे

जो अधूरी रह गई वो ख्वाहिशे अब ना रही रूसवाॅं हुई हमसे हमारी उम्र जैसे बढती गई करता रहा पूरी जिन्हे थी ख्वाईशे अपनोंकी ही इंतजार करती रही पर ख्वाईशे अपनी सभी मैं नही मायूॅंस मुझसे पर मायूॅंस हैं ये ख्वाईशे प्यासा रखा मैने उन्हे बरसाई कहीं और बारिशे मानता हूॅं गलती मेरी ख्वाहिशोंको जो दी हवा क्यो दिया उसको बढावा मर्ज की जब ना थी दवा २४-१२-२०१८