हव्यास
मधुर स्मृतींचे आकाश
कटू आठवणींचे मेघ
क्वचितच डोकावणारी
आशेची सुवर्ण रेघ
मनाच्या पटलावरती
चालतो अखंड खेळ
निरभ्र दर्शन क्षणभर
काळोखी बाकी वेळ
कितीही घाला फुंकर
खो देती एकमेका
सुखाच्या क्षणांवर मात
करतो प्रसंग बाका
सुखदु:खाप्रती असावी
म्हणे दृष्टी कायम सम्यक
आहे असा महात्मा कुणी
की कल्पना केवळ भ्रामक?
पडती प्रयास अपुरे
का पडतो कमी अभ्यास?
का सोडून द्यावा आता
स्थिरचित्ताचा हव्यास?
१९-०७-२०१९
कटू आठवणींचे मेघ
क्वचितच डोकावणारी
आशेची सुवर्ण रेघ
मनाच्या पटलावरती
चालतो अखंड खेळ
निरभ्र दर्शन क्षणभर
काळोखी बाकी वेळ
कितीही घाला फुंकर
खो देती एकमेका
सुखाच्या क्षणांवर मात
करतो प्रसंग बाका
सुखदु:खाप्रती असावी
म्हणे दृष्टी कायम सम्यक
आहे असा महात्मा कुणी
की कल्पना केवळ भ्रामक?
पडती प्रयास अपुरे
का पडतो कमी अभ्यास?
का सोडून द्यावा आता
स्थिरचित्ताचा हव्यास?
१९-०७-२०१९
Comments
Post a Comment