मद्य

एका दारूगुत्ता चालवणाऱ्याकडे मित्राने दारूची मागणी केली असता त्याने दिलेले उत्तर -

मद्य मागसी माझ्या सख्या, परि
मद्य बाटल्या रिकाम्या सडति घरी !

आजवरी काचेच्या पेल्यातूनी
मद्य पाजिले तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.

नैवेद्यापुरती एकच चपटी
अता मद्याची माझ्या गाठीं;
मरणचाहूली ढोसावी ओठी
बाळगी अंथरूणीं कशी तरी.

तरूण वारुणिंची निर्लज्ज कुजबुज,
पहिल्या धारेचे गूढ मधुर गुज
संसारतापातून सुटका हवी तुज,
मद्य गाळण्या परि बळ न करीं !

सडला रे सडला देह सखया !
यकृत सडले भिवविते हृदया,
आता मद्याचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

- भारावलेले काळे (विद्याधर)
१०/०६/२०१९

प्रेरणास्त्रोत : भा. रा. तांब्यांची अजरामर कविता

मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis