* जन्मा ही तुझी कहाणी
बऱ्याच जणींना नीट निरखून
निवडली असेल तिला पारखून
जिंकली असतील सौंदर्याने
घरातल्या सर्व जणांची मने
करून व्यवहाराची बोलणी
मुहुर्त ठरला असेल शुभशकुनी
हारतुरे लेवून वाजतगाजत
झालं असेल तिचं घरी स्वागत
नीट वागवण्याच्या आणा भाका
तिच्याबरोबर मारण्या फेरफटका
डौलाने रस्यावर फिरताना
वळल्या असतील लोकांच्या माना
शेजारी पाजारी पसरता ख्याती
अभिमानाने असेल फुलली छाती
कानामागुनी मग कुणी अवतरली
अन् बघता बघता तिखट झाली
दुर्लक्षाची ती शिकार झाली
होती नव्हती ती रयाच गेली
असते अताशा पडुनी खितपत
कौतुकभरल्या हाताच्या प्रतीक्षेत
न्हाऊमाखू घालेल कधी कुणी
करेल कुणीतरी तेलपाणी
आशेवर जगते ती केविलवाणी
* जन्मा ही तुझी कहाणी
०९-०४-२०१९
निवडली असेल तिला पारखून
जिंकली असतील सौंदर्याने
घरातल्या सर्व जणांची मने
करून व्यवहाराची बोलणी
मुहुर्त ठरला असेल शुभशकुनी
हारतुरे लेवून वाजतगाजत
झालं असेल तिचं घरी स्वागत
नीट वागवण्याच्या आणा भाका
तिच्याबरोबर मारण्या फेरफटका
डौलाने रस्यावर फिरताना
वळल्या असतील लोकांच्या माना
शेजारी पाजारी पसरता ख्याती
अभिमानाने असेल फुलली छाती
कानामागुनी मग कुणी अवतरली
अन् बघता बघता तिखट झाली
दुर्लक्षाची ती शिकार झाली
होती नव्हती ती रयाच गेली
असते अताशा पडुनी खितपत
कौतुकभरल्या हाताच्या प्रतीक्षेत
न्हाऊमाखू घालेल कधी कुणी
करेल कुणीतरी तेलपाणी
आशेवर जगते ती केविलवाणी
* जन्मा ही तुझी कहाणी
०९-०४-२०१९
Comments
Post a Comment