काहिली काहिली

हो रब्बा कोई तो बताए च्या चालीवर!


माझ्या काळजाची झाली काहिली काहिली
तुला पहिल्यांदा होती जेव्हा मी पाहिली

होत्या पाहिल्या किती या आधी यौवना
मनी उचंबळली नाही कधी ही भावना
याला काय म्हणू मी ही नव्हे वासना
झाले मला काय ते माझे मला कळेना

सदा वावरते भवती तुझी स्वप्नसावली
विचारांनी तुझ्या आता माझी झोप उडवली

होती वाटली मला जी कवी कल्पना
अनुभवली स्वत: मी गोड ती वेदना
कधी गोड शिरशिरी तर कधी यातना
रोज उमटते मनी नव संवेदना

माझ्या ह्रदयाची तार तूच झंकारली
बघता वाजते सतार माझ्या कानी सुरीली

असतो उतावीळ मी रोज तुज दर्शना
जीव भांड्यात पडतो होता पुरी कामना
नक्की रोग कोणता या कसल्या खाणाखुणा
प्रेमाने पछाडलो का झालो मी दिवाणा

हो वैद्य आणि तू तपास माझी ख्यालीखुशाली
होकाराचा दे उतारा स्वत: वा उलटटपाली


२३-०४-२०१९

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis