घर
रांगोळीनं सजलेल अंगण
मधोमध तुळशी वृंदावन
बहरलेली फुलबाग परसदारी
झोपाळ्यावर झुलणारी ओसरी
मजबूत दगडी भिंतींचे रिंगण
नाजूक पडद्यांना खिडक्यांचे कोंदण
नव्याने शाकारलेलं कौलारू छत
वाटेतलं सुंदर सुबक घर चित्रवत
पाहिले किती उन्हाळे पावसाळे
आणि सोसली किती वादळे
तरीही होते उभे उजळ माथ्याने
रोज सजावे जसे एखाद्या सौभाग्यवतीने
काय झाले अचानक कुणास ठाऊक
पण बघून आजचे स्वरूप झालो मी भावूक
रांगोळी गेली होती विस्कटून
तुळशी सुध्दा गेली होती सुकून
फुलझाडांनी टाकली होती मान
तिरडीगत झोपाळा आणि शांतता स्मशान
भिंतीवर चढलेलं हिरवं शेवाळं
खिडकीत गुंफलेलं कोळ्याचं जाळं
काळवंडलेलं कौलारू छत
सुंदर असणारं घर होतं मृतवत
काय असेल घडलं होतं कोडं मला पडलं
चौकशीअंती कळलं प्रेमाला संशयानं गिळलं
घर होतं शाबूत पण चैतन्य हरवलं
शरीर होतं जिवंत पण मन उन्मळलं
१४-०३-२०१९
मधोमध तुळशी वृंदावन
बहरलेली फुलबाग परसदारी
झोपाळ्यावर झुलणारी ओसरी
मजबूत दगडी भिंतींचे रिंगण
नाजूक पडद्यांना खिडक्यांचे कोंदण
नव्याने शाकारलेलं कौलारू छत
वाटेतलं सुंदर सुबक घर चित्रवत
पाहिले किती उन्हाळे पावसाळे
आणि सोसली किती वादळे
तरीही होते उभे उजळ माथ्याने
रोज सजावे जसे एखाद्या सौभाग्यवतीने
काय झाले अचानक कुणास ठाऊक
पण बघून आजचे स्वरूप झालो मी भावूक
रांगोळी गेली होती विस्कटून
तुळशी सुध्दा गेली होती सुकून
फुलझाडांनी टाकली होती मान
तिरडीगत झोपाळा आणि शांतता स्मशान
भिंतीवर चढलेलं हिरवं शेवाळं
खिडकीत गुंफलेलं कोळ्याचं जाळं
काळवंडलेलं कौलारू छत
सुंदर असणारं घर होतं मृतवत
काय असेल घडलं होतं कोडं मला पडलं
चौकशीअंती कळलं प्रेमाला संशयानं गिळलं
घर होतं शाबूत पण चैतन्य हरवलं
शरीर होतं जिवंत पण मन उन्मळलं
१४-०३-२०१९
Comments
Post a Comment