प्रेमसोहळा

प्रेमासक्त गवळण राधा
ग्रीष्मातील तृषार्त धरणी
स्निग्ध भुकेला श्रीकृष्ण
घन नीळ अवतरे गगनी

बघताच एकमेकांना
विरहाचा फुटतो बांध
बरसतो होऊन पाऊस
उधळतो प्रेम मृद्गंध

भेटीची आस दोघांना
मिलनाचा शुध्द हेतू
पाऊस प्रेमाचा बनतो
द्वैत अद्वैतातील सेतू

चालतो चार महिने
प्रेमाचा असा सोहळा
तृप्तीची दाटते हिरवळ
संपतो ऋतू पावसाळा


२४-०८-२०१९

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis