Posts

Showing posts from 2016

भविष्याचे भूत

भविष्याच्या गर्भात दडल्यात लाखो शक्यता काय वाढलेय पुढे कोणालाच नसतो पत्ता मग असो तो कोणीही म्हणवतो जो भविष्यवेत्ता किंवा म्हणतो ज्याला आपण जगन्नियंता निवडतो आपण सर्वथा पडताळून सर्व शक्यता करावी कुठली क्रिया वा स्वीकारावी निष्क्रीयता क्रिया प्रतिक्रियांच्या होती तयार, साखळ्या अब्जावधी भविष्य सरकते वर्तमानातून भूताकडे प्रत्येक क्षणामधी भविष्याचा फार तर वर्तवता येतो अंदाज भविष्य घडवणार मी करू नये कोणीच माज केवळ स्वकतृत्वावर घडत नसते भविष्य दुवा साखळीचा प्रत्येक बजावतो भूमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष एक जरी निखळला दुवा बदलेल घटनाक्रम कर्म केले कितीही उत्तम पाणी फिरवेल नियती चक्रम मनोरंजनासाठी निर्मात्याने बनवला जगाचा सारीपाट सोडून दिले असावे त्यावर सजीव मोहरे सतराशे साठ काय होईल सादर त्यावर त्यालाही नसावी कल्पना भविष्य जाणण्याची म्हणुनि करू नये कोणी वल्गना उगाच गंभीरपणे घेतो आपण निर्मात्याचा हा जीवघेणा खेळ लावत बसतो अर्थ घटनांचा अन् आपल्या जीवनाचा मेळ आपल्या हाती केवळ टाकणे प्रयत्नाचा फासा मनासारखे पडेल दान याचा नाही काही भरवसा कर्म आण...

घाई नको बाई अशी

सकाळी मित्रमंडळीसमवेत टेकडीवर किंवा इतरत्र फिरण्याचा व्यायाम आणि त्यानंतर एखाद्या हॉटेलमधे चहानाश्ता या रविवारच्या रूटीनला बऱ्याच वेळा उशीर होतो आणि मग नवराबायकोत जो संवाद होतो तो या द्वंद्वगीतात शब्दबध्द करायचा प्रयत्न केलाय! बायको: घाई करा बाई घरी येण्याची वेळ झाली जाईल हो माघारी बघुनी ती कुलूप दारी होता उशीर कामे सारी पडतील तिची माझ्या उरी करूनि दोन्ही तंगड्या वरी पसराल तुम्ही कोचावरी नवरा: घाई नको बाई अशी माघारी जाईल कशी पकडू तिला शेजारी होऊ नको वेडीपिशी मित्रमंडळी जमली खाशी चार घास उतरू दे घशी त्यावर चहाची कपबशी धर तोवर धीर जराशी बायको: रमता तुम्ही मित्रांपाशी डबक्यात जशा डुंबती म्हशी निघणार नाही पाय तुमचा दिल्याशिवाय काठीने ढुशी सौदा माझा तुमची खुशी तरी पाडता मला तोंडघशी मदत मागता शिंकते माशी नेहमीचीच तुमची मखलाशी नवरा: भीक नको तोंड आवर जाऊ चल घरी सत्वर तक्रारीला वाव नको पोचवतो तुज वेळेवर जरी समजा झाला ऊशीर बाई असेल परतली जर आलिया भोगासी विनातक्रार होइन मी स्वत:हून सादर ०६/११/२०१६

एक दुचाकी द्या मज आणुनी

केशवसुतांच्या  एक तुतारी द्या मज आणून चे विडंबन एक दुचाकी द्या मज आणुनी हाकीन जी मी स्व:पायाने घालेन पालथी सारी धरणी दीर्घ तिच्यावरच्या रपेटीने अशी दुचाकी द्या मजलागुनि पळेल सुसाट जी रस्त्यावरूनि गियर बदलुनी लोण्यावाणी चढणीलाही पाजेल पाणी गाड्या जाऊ द्या मरणालागुनि वापर त्यांचा पुसुनी टाका धूर ओकती ज्या भकाभका सावध ऐका धरणीच्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक दुचाकी द्या मज आणुनी प्राप्तकाल हा विशाल भूधर नको तया प्रदूषणाची बाधा निजनामे त्या वरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करूनि ह्या गाड्यांवर शुरांनो या त्वरा करा रे धरणी चा ध्वज उंच धरा रे नीती ची द्वाही फिरवा रे दुचाकीच्या या चाकांबरोबर १८/१०/२०१६

दुःख दुचाकी

काल पहाटे मित्रांसंगे सायकलीस मी दामटले तीन तासांनी परतलो लंगडत बायको म्हणाली काय घडले आता सांगू कसा बोलू कसा दोष कुणाला देऊ कसा पडलो मीच आग्रहास बळी अन् कुठुनी आठवली अवदसा किलीमांजारो जमला असता पोचलो असतो जसातसा युरोप सायकलिंग करण्या नव्हता माझा माझ्यावर भरवसा किलीमांजारोला आडवा आला गुडघा माझा हा दुखरा मित्र म्हणाले सायकलिंगला नसतो गुडघ्याचा नखरा डॉक्टर मित्रांनी दिला दुजोरा सर्वांनीच केला आग्रह बायकोनेही देता परवानगी तोडला मनाचा मी निग्रह सायकलिंगचे निमित्त केवळ लोभ मित्रांच्या संगतीचा केला नाही विचार मग मी फारसा मागचा वा पुढचा काढून टाकले त्वरित ऑनलाईन  नॉनरिफंडेबल एअर तिकिट नव्हते वाटले सरावामधेच उडेल माझी त्रेधातिरपिट अर्धसत्य गुडघ्याचे सांगितले मित्र निघाले माझे हुशार मांड्या आणि पोटऱ्यां विषयी शब्द काढला नाही चकार पिरंगुटच्या पहिल्या खेपेतच सर्व स्नायु झाले ताठर पर्याय नाही आता विद्याधर आलिया भोगासी व्हावे सादर १७/०८/२०१६

आयुष्याचं कोडं

काय करावं आयुष्याचं उलगडत नाही कोडं पन्नाशीत सुध्दा कळतं चुकलंय गणित थोडं आवडत नसली तरी जुंपतो नोकरीच्या घाण्याला कोणतंही कारण पडतं पुरं बहाण्याला पुढे केली जाते चिंता कसं होईल उदरभरण कसं परवडावं आणि मुलांचं उच्च शिक्षण पैसा असला कितीही जमवलेला गाठी वाटत नाही पुरेसा आपल्याच हव्यासापोटी आवडनिवड छंद वगैरे सारले जातात बाजूला झापड लावून धावतो पैशामागे ठेवून गहाण बुध्दीला कातडी जरी झाली जाड खाऊन चाबकाचा मारा खचत जाते तब्येत सोसून मनाचा कोंडमारा थांबून क्षणभर कधीतरी घ्यावा थोडासा आढावा मार्ग पुढील आयुष्याचा पुन्हा एकदा आखावा सगळेच धावतात म्हणून आपण धावणे सोडूया जमेल जेवढे लवकर तेव्हढे स्वच्छंद जगूया ११/०७/२०१६

अधर्मी धर्म

बसवले माणसाच्या मानगुटीवर ज्यांनी देवाधर्माचे भूत सैतानच असले पाहिजेत ते नाही कुणी शांतीदूत कपोलकल्पित स्वर्गाचे दाखवून अमिष मोठे नरकाची घातली भिती रंगवून चित्र भयाण खोटे दु:खाने पीडित जनतेला वाटले हे प्रेषित तारणहार त्यांच्या मूढ शिकवणीचा केला आंधळेपणाने स्वीकार हिरीरीने त्यांनी केला आपल्या धर्माचा प्रचार साम दाम दंड भेद नीतीने जगभर केला त्याचा प्रसार भोगतोय सगळेच आता धर्मांधतेची विषारी फळे तरीही येतात मानवतावाद्यांना या अतिरेक्यांचे कळवळे तोडली पाहिजेत सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे धर्माच्या ठेकेदारांना टाकून गजाआड, लावले पाहिजे टाळे पुरे झाले लाड धर्माचे नकोत धर्मा कोणी वाली धर्माचे राज्य अवतरेल देऊन धर्मालाच तिलांजली १५/०७/२०१६

विज्ञानाचं घोडं

पूर्वीसारखा पाऊस हल्ली पडत नाही छत्रीशी आजकाल फारसे अडत नाही थंडीचेही काहीसे झालेय तसेच स्वेटर घालावा तर भिती होईल आपले हसेच उन्हाळ्यात मात्र जीव होतोय हैराण वाटू लागते शहरसुध्दा जसे वाळवंट वैराण नक्कीच बिघडू लागलाय निसर्गाचा समतोल ग्लोबल वाॅर्मिंग म्हणा किंवा ओझोन होल काय सोडून जातोय आपण पाठीमागे वारसा नवीन पिढीला कसा वाटावा निसर्गाचा भरवसा केलं तेवढं नुकसान नाहीका पुरे झालं थोडं करूया आता तरी पुढच्या पिढ्यांचं भलं लावली नाही झाडं तरीसुध्दा चालेल असलेली जगवली तरीही पृथ्वी तरेल निसर्गाच्या कलानं घेऊ आता थोडं दामटवणं थांबवूया उद्दाम विज्ञानाचं घोडं २३/०६/२०१६

बहावा

तुला पाहते च्या चालीवर   वाचा तुला पाहू का मी त्याला पाहू ग नको त्यापुढे तू उभी राहू ग फुलांनी बहरला असे तो बहावा तू असता समोरी कसा मी पहावा बहाव्या तुझाकी हो वाटेल हेवा तुला पाहू का मी ..... बहरले फुलांचे जसे घोस पिवळे पसरले बटांचे तुझ्या गाली जाळे बहाव्यातही मी तुला पाहतो ग तुला पाहू का मी ..... तुझी माझी प्रीत असे ही युगाची बहाव्याप्रती का भीती मग फुकाची बहर हा फुलांचा किती तो टिकेल तुला पाहू का मी ..... तू ये ना जराशी माझ्या बाहूपाशी बहाव्याच्या पाहू फुलांच्या या राशी नयनी टिपावा नी ह्रदयी फुलावा तुला पाहू का मी ..... १९ / ०५ / २०१६

कविता रोमॅंटिक

मित्रांनी केली मागणी लिही कविता रोमॅंटिक पुरे झाल्या कविता तुझ्या रूक्ष वैचारिक बस झाले देणे तुझे आमच्या डोक्याला ताण येऊदे कवितेतून थोडे आता भावनेला उधाण बसलो लगेच मीही बाह्या माझ्या सरसावून तारूण्यातील आठवणी काढल्या परत खणून तारूण्याच्या उंबरठ्यावर होणारा खेळ नजरेचा होतो आरंभ ज्यातून प्रवास एकतर्फी प्रेमाचा प्रवासातील त्या रोमान्स मांडला मी कवितेतून लिंग निरपेक्ष अशा त्रयस्थाच्या भूमिकेतून पुरूषांना जास्त आणि स्त्रियांना कमी अधिक वाटले होते सगळ्यांनाच करेल कविता नोस्टाल्जिक आढळला नाही बहुतेक कोणा त्यात रोमान्स एकूणच पाहता मिळालेला कवितेला थंडा   रिस्पॉन्स  केले मग मीच माझ्या कवितेचे त्या विश्लेषण प्रथमपुरूषी एकवचनी हवे होते का ते निरूपण का पडले शब्द कमी भावनांची करण्या उकल रंगवले नाही असहाय झुरणारे मन विकल फुलवायला हवा होता का पिसारा मी मनमोराचा का होता रंगवायला चेहरा चित्तचोराचा बसलो मग मी पु...

खजिना प्रेमाचा

नकळत त्यांच्या किती किशोरी उतरल्या माझ्या मन मंदिरी  हळूच अन् मग एक सुंदरी शिरली थेट की हो गाभारी दाबावी कळ चुकून एक अन् अचानक उघडावा चोरकप्पा खळ्कन जावे दिपून तेजाने नयन खजिन्याचे अन् होता दर्शन तसेच काहीसे माझे घडले नव भावनांचे दार उधडले भांबावले मन अश्रध्दापरि जया अचानक दर्शन घडले भावगीतांतील शब्दांमधले अर्थ अचानक मज उलगडले नव्हती कल्पना त्याची मजला खोल मनामधे होते जे दडले दगडाच्या या माझ्या ह्रदयाला भावनांचे नवे पाझर फुटले मित्र मला मग ते आठवले अनुभव हा होते मज वदले हसून केली चेष्टा ज्यांची होते त्यांना मी हिणवले प्रकरणास त्या गौण असे मग वळण कसे कोणते लागले ठाम नसावा समज कोणता कोणा ठावे पुढे काय मांडले १६ मे २०१६

एकतर्फी प्रेमकहाणी

तारूण्याच्या उंबरठ्यावर नजर होती का भिरभिरती न्याहाळले का चेहरे तुम्ही वावरणारे अवतीभवती काही मोजक्या चेहऱ्यांनी सोडली असेल छाप बघून कोणाला मनात आलेही असेल पाप का होता तुम्ही त्यातले म्हणती ज्याना पापभिरू वा होता ध्येयवादी निश्चयाचे महामेरू समोर येता काही चेहरे रस्त्यावर गल्ली बोळी क्षणिक सुखाची उर्मी असेल मनी अवतरली खेळला का अशावेळी नजरानजरेचा खेळ रोखून नजर नजरेवर जमेल तेवढा वेळ असतील नजरा काही लगेच वळल्या खाली असेल नजर कोणाची जी पुरून तुम्हा उरली होता का चेहरा त्यातील एखादा एवढा खास घेतला असेल ज्याने ह्रदयाचा तुमच्या घास बघताक्षणी डोक्यात वाजली होती का घंटा किंवा आला विचार लग्नाचा उफराटा का चढला हळूहळू प्रेमाचा तप्त ज्वर भिनला मनात प्रेमाच्या बासरीचा मधाळ स्वर शिजवला का मग तुम्ही प्रेमाचा पुलाव खयाली विणली असतील मनी सुंदर स्वप्नेही मखमाली मारल्या असतील कितीदा त्या ठिकाणी तुम्ही चकरा झाल्या ज्या ठिकाणी नजरा नजरांच्या टकरा सोडूनी रोजचा रस्ता वाट धरली का आडवळणी बांधलाही अस...

कविता आणि iPhone

झाले किती आठवडे झाले किती दीस पाडून विचारांचा आणि शब्दांचा कीस केली नाही कविता तुम्हासमोर सादर प्रशंसेच्या मोहाला घालू म्हटलं आवर रिकामे डोके म्हणतात असते सैतानाचे घर माझ्या रिकाम्या डोक्यात मात्र कवितेचा वावर पूर्वी करायचो डोक्यावर संगीताचा वर्षाव डोके रिकामे रहायला द्यायचोच नाही वाव घेतला iPhone तेव्हापासून बंद झाली आकाशवाणी ऐकणे माझे बंद झाले मोकळ्या वेळी गाणी सकाळी चालताना मग करायचे काय? डोक्यातल्या विचारांना फुटले कवितेचे पाय iPhone च्या Notes मधे नोंदायला लागलो कडवी सुचतील जशी डोक्यात असेनात का आडवी तिडवी त्यातल्या एखाद्या कडव्याला फुटू लागले धुमारे जमू लागले त्याभोवती विचार, शब्द सुसंगत सारे केल्यावर कडव्यांवर त्या थोडेफार संस्कार हळूहळू कविता त्यातून घेऊ लागली आकार आयता वाचकवर्ग होता Whatsapp चे group प्रतिसादाने तुम्हा मित्रांच्या मिळाला मजला हुरूप आठवड्या पंधरवड्यामागे सतत केल्या कविता सादर जे जे आले जसे मनात धरून त्या विषयांचा पदर कविता आणि iPhone चा संबंध असा बा...

साहित्यातली मिरासदारी

द . मां . च्या दमानं वाटलं घ्यावं दमानं कविता गुंडाळून बासनात बसावं गप गुमान मन मात्र माझं करून उठलं बंड का ऐकायचं यांचं झाली म्हातारी जी धेंडं पुरे झाली यांची साहित्यातली मिरासदारी निघालेत आता करण्या जे कविंची खानेसुमारी वय झालंय यांचं द्यायचं आशीर्वचन पोटात दुखतय यांच्या होउन कवितांचे अपचन कवितेच्या शेतात असतीलही तण फोफावतील तिथुनच बहरणारे वृक्षपण का निघालेत खुडायला कोवळे सुकुमार कोंब फुलण्याआधीच विरूध्द त्यांच्या , का मारताय बोंब पुरते काडी एक सगळे शेत पेटवायला होइल राख , लागेल ओले सुक्याबरोबर जळायला पेटवण्यापेक्षा काडी घालावं खतपाणी फुलेल त्यातूनच कविता गोजिरवाणी आहे हक्क बुजुर्गांना नाराजी व्यक्त करण्याचा करावी की खाजगीत का हव्यास व्यासपीठाचा घालत नाही भीक विद्याधर असल्या पोकळ वास्यांना असेल घर बडे तयांचे किंमत ना त्यांच्या शब्दांना २९ एप्रिल २०१६

Root Cause Analysis

मानवी कृतींचा केला एकदा Root Cause Analysis म्हटलं मिळवावी PhD लिहून एखादा Thesis सर्वप्रथम लिहून काढल्या मूलभूत प्राकृतिक कृती श्वसन , निद्रा , प्रात : र्विधी विनासायास ज्या होती लागती यत्न ज्यासाठी स्वसंरक्षण व अन्नप्राशन जीवनचक्र ठेवण्या अबाधित आवश्यक मग प्रजनन अन्य कृतींचे असते बहुधा यापैकी एखादे कारण जन्म घेई मग नवी संतती आले करणे पालनपोषण असो मानव वा असो पशु होई लागू हे सर्वांसाठी मानवास पण विशेष दान मेंदू अन् मन त्या गाठी मेंदूचा मग त्या करून वापर केली तयाने क्रांती अन्न वस्त्र अन् निवाऱ्याची सोडवली बुध्दीने भ्रांती मन मात्र तयाचे अजब रसायन घेइना ते विश्रांती भय आणि मोहाच्या आहारी ढळली त्याची शांती     भय भविष्यातल्या संकटांचे अन् गमावण्याचे जे संग्रही मोह संचयाचा भविष्यासाठी करण्याकरता बेगमी भय कष्टप्रद आयुष्याचे कठीण वृध्दापकाळी मोह   प्राप्त कराया ऐषारामी कायम जीवनशैली भय रोगांचे , बेढबतेच...