एक दुचाकी द्या मज आणुनी
केशवसुतांच्या एक तुतारी द्या मज आणून चे विडंबन
एक दुचाकी द्या मज आणुनी
हाकीन जी मी स्व:पायाने
घालेन पालथी सारी धरणी
दीर्घ तिच्यावरच्या रपेटीने
अशी दुचाकी द्या मजलागुनि
पळेल सुसाट जी रस्त्यावरूनि
गियर बदलुनी लोण्यावाणी
चढणीलाही पाजेल पाणी
गाड्या जाऊ द्या मरणालागुनि
वापर त्यांचा पुसुनी टाका
धूर ओकती ज्या भकाभका
सावध ऐका धरणीच्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक दुचाकी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
नको तया प्रदूषणाची बाधा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करूनि ह्या गाड्यांवर
शुरांनो या त्वरा करा रे
धरणी चा ध्वज उंच धरा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
दुचाकीच्या या चाकांबरोबर
१८/१०/२०१६
एक दुचाकी द्या मज आणुनी
हाकीन जी मी स्व:पायाने
घालेन पालथी सारी धरणी
दीर्घ तिच्यावरच्या रपेटीने
अशी दुचाकी द्या मजलागुनि
पळेल सुसाट जी रस्त्यावरूनि
गियर बदलुनी लोण्यावाणी
चढणीलाही पाजेल पाणी
गाड्या जाऊ द्या मरणालागुनि
वापर त्यांचा पुसुनी टाका
धूर ओकती ज्या भकाभका
सावध ऐका धरणीच्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक दुचाकी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
नको तया प्रदूषणाची बाधा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करूनि ह्या गाड्यांवर
शुरांनो या त्वरा करा रे
धरणी चा ध्वज उंच धरा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
दुचाकीच्या या चाकांबरोबर
१८/१०/२०१६
Comments
Post a Comment