MeToo MeToo

छळलं तुला ज्यानं तू त्यालाच हानलं
तुझ्या ग बोलण्याला सगळ्यांनी मानलं
शेजारपाजारचा प्रत्येक पोपट
लागलाय घाबरायला
आता लागलाय घाबरायला

रोज नवीन एक मैना
लागलीय metoo metoo बोलायला

काय सांगू तुला या पोपटाची गोष्ट
गोष्ट इतकी कळलीय स्पष्ट
पाहून मोका मैनेचा झोका
पाहून मोका मैनेचा झोका
लाळ लागतीय गळायला
लाळ लागतीय गळायला

रोज नवीन एक मैना
लागलीय metoo metoo बोलायला

जोवर होती मैनेला जोडी
तोवर पोपट दुरूनी ताडी
एकांत पाहून, संधी साधून
एकांत पाहून, संधी साधून
शिकार करायला
बघतो शिकार करायला

रोज नवीन एक मैना
लागलीय metoo metoo बोलायला

पोपट जसा घालतो गळ
घाबरते मैना होई घालमेल
संधी ती पाहून जाते ती धाऊन
संधी ती पाहून जाते धाऊन
खोलून पिंजरा पोपटाचा
खोलून पिंजरा पोपटाचा

रोज नवीन एक मैना
लागलीय metoo metoo बोलायला

पोपट होता लयलय गुनी
आदर होता सगळ्यांच्या मनी
आरोप होता मैनेचा आज
आरोप होता मैनेचा आज
लागलाय झोंबायला
आता लागलाय झोंबायला

रोज नवीन एक मैना
लागलीय metoo metoo बोलायला


१८-१०-२०१८

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis