आरोहण
हिवाळा उन्हाळा अन्
नेमेचि येतो पावसाळा
त्याच त्या दिनक्रमाचा
येतो कधीतरी कंटाळा
धाडला जातो संदेश
उदास अशा संध्याकाळी
वाफाळत्या चहाभोवती
जमा होते मित्रमंडळी
चौफेर विषयांवर मग
रंगत जातात गप्पा
गतप्रवासातील आठवणींचा
गाठला जातो टप्पा
कडू गोड आठवणींचा
होतो पुन्हा उजाळा
कुठच्या कुठे पळतो
मरगळ अन् कंटाळा
नवीन मोहिमेचे हिरीरीने
मांडले जातात प्रस्ताव
स्वप्नरंजनात बुडते मन
चहात बुडता लोणीपाव
उत्साहाला सर्वांच्याच
येते नव्याने उधाण
बऱ्याच चर्चेअंती निश्चित
होते वेळ अन् ठिकाण
केला जातो सर्वांना
सामील होण्याचा आग्रह
हो ना करता करता
ठरतो जुना नवा मित्रसमूह
दर आठवड्याला सिंहगड
चढण्याचा होतो ठराव
सुरू होतो उत्साहाने
ठराविक लोकांचा सराव
हळूहळू मोहिमेचा दिवस
येत जातो जसा जवळ
उरलेल्या खरेदीसाठी
उडते एकच धावपळ
होते तयारी जय्यत
अखेर उगवते ती पहाट
पाहिली कित्येक दिवस
आतुरतेने जिची वाट
सुरूवातीचा रस्ता असतो
बहुधा सरळ सपाट
उत्साहाने ओसंडत असते
सगळ्यांच्या मनाचे कपाट
कधी न कळे घेते मोहिम
अवघड असे मग वळण
संपत नाही चढली कितीही
छातीवरची उभी चढण
निर्धाराने पोचतो मुक्कामी
जो तो टाकत धापा
सोपी आहे मोहिम कळते
होत्या केवळ भूलथापा
शीण होतो हलका रंगतात
भेंड्या आणि पत्त्याचे डाव
नव्या दमाने गाठले जातात
रोज पडावामागे पडाव
कुरकुरते तन वाटतो तयाला
कधीकधी हा प्रवास खडतर
मना रिझवतो परि निरंतर
चहूकडे जो निसर्ग सुंदर
प्रवासात कुणी नसे एकटा
करतो तयास साथ संगत
कधी क्षीण तर कधी तीक्ष्ण
खळाळत्या नदीचा नाद अनाहत
चिंब भिजावे मन कोणाचे
बधून अवखळ मधेच निर्झर
कुणी भिजावे अंतर्बाह्य
तुषार त्याचे घेउनी अंगावर
कधी अचानक समोर यावे
आरस्पानी शांत सरोवर
न्याहाळते बिंब स्वत:चे
जयात उन्नत शुभ्र हिमशिखर
पालटते जे रूप स्वत:चे
रविकिरण देता झळाळी
निमिषार्धात रंग बदलते
शुभ्रधवल ते लख्ख सोनसळी
ईप्सितस्थळी पोचता दिसे
दृष्य जे दे स्वर्ग आभास
गोठवते मन त्या क्षणास
ज्यासाठी केला हा अट्टाहास
१८-०९-२०१८
नेमेचि येतो पावसाळा
त्याच त्या दिनक्रमाचा
येतो कधीतरी कंटाळा
धाडला जातो संदेश
उदास अशा संध्याकाळी
वाफाळत्या चहाभोवती
जमा होते मित्रमंडळी
चौफेर विषयांवर मग
रंगत जातात गप्पा
गतप्रवासातील आठवणींचा
गाठला जातो टप्पा
कडू गोड आठवणींचा
होतो पुन्हा उजाळा
कुठच्या कुठे पळतो
मरगळ अन् कंटाळा
नवीन मोहिमेचे हिरीरीने
मांडले जातात प्रस्ताव
स्वप्नरंजनात बुडते मन
चहात बुडता लोणीपाव
उत्साहाला सर्वांच्याच
येते नव्याने उधाण
बऱ्याच चर्चेअंती निश्चित
होते वेळ अन् ठिकाण
केला जातो सर्वांना
सामील होण्याचा आग्रह
हो ना करता करता
ठरतो जुना नवा मित्रसमूह
दर आठवड्याला सिंहगड
चढण्याचा होतो ठराव
सुरू होतो उत्साहाने
ठराविक लोकांचा सराव
हळूहळू मोहिमेचा दिवस
येत जातो जसा जवळ
उरलेल्या खरेदीसाठी
उडते एकच धावपळ
होते तयारी जय्यत
अखेर उगवते ती पहाट
पाहिली कित्येक दिवस
आतुरतेने जिची वाट
सुरूवातीचा रस्ता असतो
बहुधा सरळ सपाट
उत्साहाने ओसंडत असते
सगळ्यांच्या मनाचे कपाट
कधी न कळे घेते मोहिम
अवघड असे मग वळण
संपत नाही चढली कितीही
छातीवरची उभी चढण
निर्धाराने पोचतो मुक्कामी
जो तो टाकत धापा
सोपी आहे मोहिम कळते
होत्या केवळ भूलथापा
शीण होतो हलका रंगतात
भेंड्या आणि पत्त्याचे डाव
नव्या दमाने गाठले जातात
रोज पडावामागे पडाव
कुरकुरते तन वाटतो तयाला
कधीकधी हा प्रवास खडतर
मना रिझवतो परि निरंतर
चहूकडे जो निसर्ग सुंदर
प्रवासात कुणी नसे एकटा
करतो तयास साथ संगत
कधी क्षीण तर कधी तीक्ष्ण
खळाळत्या नदीचा नाद अनाहत
चिंब भिजावे मन कोणाचे
बधून अवखळ मधेच निर्झर
कुणी भिजावे अंतर्बाह्य
तुषार त्याचे घेउनी अंगावर
कधी अचानक समोर यावे
आरस्पानी शांत सरोवर
न्याहाळते बिंब स्वत:चे
जयात उन्नत शुभ्र हिमशिखर
पालटते जे रूप स्वत:चे
रविकिरण देता झळाळी
निमिषार्धात रंग बदलते
शुभ्रधवल ते लख्ख सोनसळी
ईप्सितस्थळी पोचता दिसे
दृष्य जे दे स्वर्ग आभास
गोठवते मन त्या क्षणास
ज्यासाठी केला हा अट्टाहास
१८-०९-२०१८
Comments
Post a Comment