वाक्बाण
कधी जाणूनबुजून
कधी अनावधानाने
घाव घातले किती
तीक्ष्ण वाक्बाणाने
नरो वा कुंजरो वा ची
पुस्ती जोडली त्याने जरी
खेळ शब्दांचाच खेळला
धर्मही कुरूक्षेत्रावरी
धारातीर्थी कुणी
कुणी शरपंजरी
वाहती बाकी उरी
जखमा अश्वत्थाम्यापरी
दुर्लक्षूनी फिरती कुणी
कुणी घालती फुंकरी
वाहतो जखमा किती
प्रत्येक आपुल्या अंतरी
अनाघ्रात राहिले ना कुणाचे
मन जखमा वेदनेचे रणांगण
काही नव्या काही पुरातन
खपल्या कुठे कुठे जुने व्रण
बोलतो मी आता कमी
होऊ नका त्याने दु:खी
भीती डिवचतील शब्द माझे
निद्रिस्त किती ज्वालामुखी
०५-०५-२०१८
कधी अनावधानाने
घाव घातले किती
तीक्ष्ण वाक्बाणाने
नरो वा कुंजरो वा ची
पुस्ती जोडली त्याने जरी
खेळ शब्दांचाच खेळला
धर्मही कुरूक्षेत्रावरी
धारातीर्थी कुणी
कुणी शरपंजरी
वाहती बाकी उरी
जखमा अश्वत्थाम्यापरी
दुर्लक्षूनी फिरती कुणी
कुणी घालती फुंकरी
वाहतो जखमा किती
प्रत्येक आपुल्या अंतरी
अनाघ्रात राहिले ना कुणाचे
मन जखमा वेदनेचे रणांगण
काही नव्या काही पुरातन
खपल्या कुठे कुठे जुने व्रण
बोलतो मी आता कमी
होऊ नका त्याने दु:खी
भीती डिवचतील शब्द माझे
निद्रिस्त किती ज्वालामुखी
०५-०५-२०१८
Comments
Post a Comment