सूर आणि सुरा
सुरेत कोणी कोणी सुरात
बुडतो आकंठ कोणी कशात
भिनते नशा नसानसात
दाटतो कंठ आवंढा घशात
मैफिलीत रंगते हे सुरसपान
आनंदलहरीत हरपते देहभान
साधक दोन्ही मार्गिका वेगळी
साध्य अंतिम ब्रम्हानंदी टाळी
२४-०२-२०१८
बुडतो आकंठ कोणी कशात
भिनते नशा नसानसात
दाटतो कंठ आवंढा घशात
मैफिलीत रंगते हे सुरसपान
आनंदलहरीत हरपते देहभान
साधक दोन्ही मार्गिका वेगळी
साध्य अंतिम ब्रम्हानंदी टाळी
२४-०२-२०१८
Comments
Post a Comment