स्वयंप्रकाशित
हृदय तुझे करण्या हस्तगत
फिरतात चोरासारखे भुरट्या
आकर्षणाने तुझ्याभोवती दुष्टग्रह
घालती अहोरात्र घिरट्या
पिलावळही असते बरोबर
असतात अदृष्यसे राहूकेतू
अधूनमधून उगवतात अचानक
बाहेरगावचे उफराटे धुमकेतू
तुला मात्र आहे ठाऊक
कशी करायची स्वसुरक्षा
ठेवतेस अंतर कायम, त्यांना
ओलांडू देत नाहीस कक्षा
चंद्राशी तुझी करून तुलना
लिहित आहेत तरीही कविता
चुकताहेत ते सारे कवि
तू तर स्वयंप्रकाशित सविता
२९/१२/२०१७
फिरतात चोरासारखे भुरट्या
आकर्षणाने तुझ्याभोवती दुष्टग्रह
घालती अहोरात्र घिरट्या
पिलावळही असते बरोबर
असतात अदृष्यसे राहूकेतू
अधूनमधून उगवतात अचानक
बाहेरगावचे उफराटे धुमकेतू
तुला मात्र आहे ठाऊक
कशी करायची स्वसुरक्षा
ठेवतेस अंतर कायम, त्यांना
ओलांडू देत नाहीस कक्षा
चंद्राशी तुझी करून तुलना
लिहित आहेत तरीही कविता
चुकताहेत ते सारे कवि
तू तर स्वयंप्रकाशित सविता
२९/१२/२०१७
Comments
Post a Comment