Come December

सरला नोव्हेंबर, डिसेंबराने
टाकलेय पहिले पाऊल
पहाटे पहाटे अलगद
लागतेय थंडीची चाहूल

सूर्यालाही थंडीची या
झाली असावी लागण
सारून रात्रीची दुलई
उशीरानेच झटकतोय किरण

शाल धुक्याची पांघरून
धरणीही घेतेय लोळण
आन्हिकांनाही देते सुट्टी
देऊन दवाचे कारण

मीही उठेन उशीरा
होती मजला ही आशा
सूर्याप्रमाणेच अन् मी
लवकर गुंडाळेन गाशा

बायकोस माझ्या परंतु
घड्याळाची या आसक्ती
का माझ्याच कपाळी यावी
वेळेवर उठण्याची सक्ती

०१/१२/२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis