वेळापत्रक
पावसाने तरी का
नेहेमी वेळापत्रक पाळावं
कधीतरी अवेळीसुध्दा
वाटत असेल कोसळावं
तुम्ही आम्हीसुध्दा
कुठे पाळतो, वेळ दिलेली
उशीराला आठवा बघू
किती कारणं पुढे केलेली
तुम्हालाही पडला असेलच
उशीर पाहुण्यांचा अंगवळणी
उगाच कशाला करताय
अवेळी पावसाची हेटाळणी
राहिलं असेल द्यायचं
जलदांचं पावसाळ्यात संचित
ठेवायचं नसेल त्याला
तुम्हाला पाण्यापासून वंचित
पदरात घ्या दान त्याचे
कितीही चिंब भिजलात तरी
दिलेत जर का शिव्याशाप
पुढल्या वर्षी पडेल भारी
२२/११/२०१७
नेहेमी वेळापत्रक पाळावं
कधीतरी अवेळीसुध्दा
वाटत असेल कोसळावं
तुम्ही आम्हीसुध्दा
कुठे पाळतो, वेळ दिलेली
उशीराला आठवा बघू
किती कारणं पुढे केलेली
तुम्हालाही पडला असेलच
उशीर पाहुण्यांचा अंगवळणी
उगाच कशाला करताय
अवेळी पावसाची हेटाळणी
राहिलं असेल द्यायचं
जलदांचं पावसाळ्यात संचित
ठेवायचं नसेल त्याला
तुम्हाला पाण्यापासून वंचित
पदरात घ्या दान त्याचे
कितीही चिंब भिजलात तरी
दिलेत जर का शिव्याशाप
पुढल्या वर्षी पडेल भारी
२२/११/२०१७
Comments
Post a Comment