साकडे
राहिली न आस काही
राहिला न ध्यास आता
का राहिला श्वास अजुनी
का चालतो छातीचा भाता
खुणवती न आव्हाने नवी
उसळतो न कधी उल्हास मनी
जगण्यात नाही राम आता
मग आता मरावे का न मी
भूतात मन रमते न आता
मन स्वप्ने भविष्याची पाहीना
वेळ उठतो खायला
पण काळ मजला खाईना
घ्यावी समाधि संतांपरी
मन ध्यानास एकाग्र होईना
जीव लावण्या नुरले कुणी
जीव देण्यासही मन धजेना
घातले जन्मास ज्याने
त्यानेच व्हावे आता पुढे
संपवावा अवतार माझा
हेचि माझे त्या साकडे
१६/१२/२०१७
राहिला न ध्यास आता
का राहिला श्वास अजुनी
का चालतो छातीचा भाता
खुणवती न आव्हाने नवी
उसळतो न कधी उल्हास मनी
जगण्यात नाही राम आता
मग आता मरावे का न मी
भूतात मन रमते न आता
मन स्वप्ने भविष्याची पाहीना
वेळ उठतो खायला
पण काळ मजला खाईना
घ्यावी समाधि संतांपरी
मन ध्यानास एकाग्र होईना
जीव लावण्या नुरले कुणी
जीव देण्यासही मन धजेना
घातले जन्मास ज्याने
त्यानेच व्हावे आता पुढे
संपवावा अवतार माझा
हेचि माझे त्या साकडे
१६/१२/२०१७
Comments
Post a Comment