यमदूत आणि सरकारी नोकर
सरकारी नोकराचा भरला घडा
अन फुरफुरला यमाचा रेडा
यमाने धाडले यमदूताला
उचलून त्याला आणायाला
लगबगीने यमदूत पोचला
सरकारी त्या कार्यालयाला
परंतु होती खुर्ची रिकामी
उशीरा यायची होती असामी
वाट पाहणे आले नशिबी
सगळीच जनता रांगेत उभी
वाट पाहण्यात काळ गेला
यमदूताच्याच कंठाशी प्राण आला
इतक्यात रांगेत हालचाल झाली
सावकाश डुलत स्वारी आली
आधीच झाला होता उशीर
यमदूत झाला होता अधीर
गाठले त्याने सरकारी नोकराला
घटका भरली कानी पुटपुटला
क्षणभर सरकारी नोकर गोंधळला
नकळत त्याने आवंढा गिळला
सावरले पण क्षणात स्वत:ला
यमदूतासमोर प्रस्ताव मांडला
कशास फिरतोस रोज वणवण
दारोदारी मृत्यूचे घेउनी आमंत्रण
रूप स्वत:चे नुरते आत्म्याला
सोडले की तयाने मर्त्य या शरीराला
ओळखेल कसा चित्रगुप्त तयाला
होता मानव वा आणले तू कीटकाला
रोज येथे मार तू फेरफटका
काढ डुलकी घटका दोन घटका
सांग मला आकडा मृत्यूसूचीतला
मारेन माशा न चुकता मी तितुक्या
प्रस्तावाला या यमदूत पडला बळी
सरकारी नोकराची खुलली कळी
अडलेली जनता रोज बघते तमाशा
सरकारी नोकर बसतो मारत माशा
२७-०५-२०१७
अन फुरफुरला यमाचा रेडा
यमाने धाडले यमदूताला
उचलून त्याला आणायाला
लगबगीने यमदूत पोचला
सरकारी त्या कार्यालयाला
परंतु होती खुर्ची रिकामी
उशीरा यायची होती असामी
वाट पाहणे आले नशिबी
सगळीच जनता रांगेत उभी
वाट पाहण्यात काळ गेला
यमदूताच्याच कंठाशी प्राण आला
इतक्यात रांगेत हालचाल झाली
सावकाश डुलत स्वारी आली
आधीच झाला होता उशीर
यमदूत झाला होता अधीर
गाठले त्याने सरकारी नोकराला
घटका भरली कानी पुटपुटला
क्षणभर सरकारी नोकर गोंधळला
नकळत त्याने आवंढा गिळला
सावरले पण क्षणात स्वत:ला
यमदूतासमोर प्रस्ताव मांडला
कशास फिरतोस रोज वणवण
दारोदारी मृत्यूचे घेउनी आमंत्रण
रूप स्वत:चे नुरते आत्म्याला
सोडले की तयाने मर्त्य या शरीराला
ओळखेल कसा चित्रगुप्त तयाला
होता मानव वा आणले तू कीटकाला
रोज येथे मार तू फेरफटका
काढ डुलकी घटका दोन घटका
सांग मला आकडा मृत्यूसूचीतला
मारेन माशा न चुकता मी तितुक्या
प्रस्तावाला या यमदूत पडला बळी
सरकारी नोकराची खुलली कळी
अडलेली जनता रोज बघते तमाशा
सरकारी नोकर बसतो मारत माशा
२७-०५-२०१७
Comments
Post a Comment