क्षितिजलालसा

क्षितिज गाठण्या घालती
पालथी कितीजण धरणी
पोचती तिथेच पुन्हा तरी
संपता परी ही गवसणी

क्षितिजासम सुंदर भवती
पसरली किती निसर्गलेणी
पर्वत कानन सरिता सागर
पशु पक्षी गाती अन् गाणी

आप्त मित्रपरिवारही असे
पखरले जणू हिरे अन् मणी
होई दुर्लक्ष त्याकडे परंतु
गाठणे क्षितिज जे झणी

आले आले हाती म्हणता
क्षितिज देते की हुलकावणी
वणवण उरते केवळ नशिबी
अखेर क्षितिज पाजते पाणी

हाती आपुल्या करणे सुखकर
आपुली जीवन कहाणी
मरणानंतर खुशाल नांदा
क्षितीजी बनूनी चांदणी


२०-०४-२०१७⁠⁠⁠⁠

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis