Entertainement Entertainment Entertainment!
कोहं हा प्रश्न कोणत्याही विचारशील माणसाला कधी ना कधी छळत असावा असा माझा उगाच एक समज आहे. त्यापाठोपाठ या सृष्टीची निर्मिती कशी झाली, का झाली आणि कोणी केली हेही प्रश्न डोके भंडावून सोडत असणार. काही मोजके लोक या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी अध्यात्माचा तर काही विज्ञानाचा मार्ग स्वीकारतात व आपले पूर्ण आयुष्य खर्ची करतात. तुमच्या आमच्या सारखे बहुतेक लोक यातल्या एखाद्या वा दोन्ही मार्गासंबंधी वेदवाङ्मयापासून ते आधुनिक विज्ञानग्रंथांचे यथाशक्ती अधून मधून वाचन करून आपापल्या परीने प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतात व त्या दिशेने थोडीफार वाटचाल करून अखेर संतांच्या 'आधी प्रपंच करावा नेटका' या सल्ल्यानुसार या प्रश्नाचा नाद सोडून आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष वळवतात.
आता या सांसारिक जबाबदाऱ्या म्हणजे काय तर कुटुंबीयांची काळजी वाहणे. कुटुंबीयांची काळजी वाहणे म्हणजे स्थूलता त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करणे, मुलांचे संगोपन, शिक्षण आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, पालकांच्या आरोग्याची काळजी वाहणे आणि त्यांना वृद्धापकाळी आधार देणे. या सर्व बाबतीत मानवात आणि इतर प्राण्यांमधे, निदान जे कळपात वावरतात त्यांच्यात,बरेचसे साम्य आढळून येते. याचाच अर्थ असाही काढता येईल की मूलतः या नैसर्गिक वृत्ती सजीवांमध्ये उपजतच असतात.
वस्त्र ही एक मूलभूत मानलेली गरज मात्र मानव आणि इतर प्राण्यांमधला फरक प्रकर्षाने दर्शवते. इतर प्राणी हे त्यांच्या शरीररचनेनुसार जे हवामान आणि प्रदेश त्यांना राहण्याकरता योग्य असतील तिथेच वास्तव्य करताना आढळतात. ऋतुमानाप्रमाणे ते स्थलांतरही करतात. परंतु मानव हा एकमेव प्राणी असा आहे कि ज्याने निसर्गाविरुद्ध जाऊन कुठल्याही हवामानाच्या प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करता येईल या उद्देशाने व थंडीवाऱ्यापासून वा प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्याकरता वस्त्रनिर्मिती केली. असे जरी असले तरी आता मात्र वस्त्राचा वापर लज्जारक्षणाकरता प्रामुख्याने केला जातो.
जसे वस्त्राचे तसेच निवाऱ्याबाबतसुद्धा थोड्याफार प्रमाणात म्हणता येईल. इतर प्राणीसुद्धा निवाऱ्याची निर्मिती करतात. वारूळ, बिळे, घरटी, पोळी ही त्याची काही ठळक उदाहरणे. पण बऱ्याच वेळा याचा वापर हा कायमस्वरूपी नसून अंडी व पिल्ले सुरक्षित राहावीत एवढ्यापुरता मर्यादित असतो. मानव मात्र कायमस्वरूपी पक्की घरे निवाऱ्याकरता बांधू लागला.
राहता राहिले अन्न. याबाबतीत सुद्धा बाकीचे प्राणी आणि मानवात तफावत आहेच. मानव हा एकमेव प्राणी केवळ नैसर्गिक स्वरूपातील अन्न न खाता प्रक्रिया केलेले अन्न खातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी.
हे सर्व बघितले तर सर्वसामान्यपणे असे म्हणायला हरकत नसावी की मानवासहित सर्व प्राण्यांची (किंवा सजीवांची) मूलभूत गरज व उपजत वृत्ती ही स्वसंरक्षण (self preservation) व स्वजातीरक्षण (sustenance of species) आहे. अन्न हे स्वसंरक्षणाकरता अत्यावश्यक असून वस्त्र व निवारा या केवळ मानवनिर्मित पूरक गोष्टी आहेत आणि प्रजनन हे स्वजातीरक्षणाकरता आवश्यक आहे.
आदिमानव ते आधुनिक मानव ही जी उत्क्रांती झाली ती होण्या अगोदरचा मानव आणि इतर प्राण्यांच्या मूलभूत गरजात काहीच फरक नसावा, मात्र बुद्धीचा वापर करून व निसर्गातील सर्व घटकांचा अभ्यास करून मानवाने सर्वप्रथम या सर्व गरजा भागवण्यासाठी विविध कला अवगत केल्या.
सर्वप्रथम जीवनावश्यक कलांचा विकास झाला असावा. जसे की जंगली श्वापदांपासून संरक्षणाकरता किंवा प्राण्यांची शिकार करण्याकरता दगडांपासून अणकुचीदार शस्त्रे तयार करण्याची कला. अग्नी प्रज्वलित करण्याची कला. पाककला विकसित झाली असावी खाण्यायोग्य अन्नप्रकारात वाढ करून उपासमारीपासून बचाव करण्याकरता. त्याचप्रमाणे अन्नपुरवठ्यात सातत्य राहावे याकरता शेतीची कला अशा कलांचा विकास झाला असावा. त्याचबरोबर वल्कलांचा किवा प्राण्यांच्या त्वचेचा वापर थंडीवाऱ्यापासून संरक्षणाकरता करतानाच विणकामाची कला विकसित करून वस्त्रनिर्मिती सुरु झाली असावी. सुगरणीचे घरटे किव्वा तत्सम नैसर्गिक क्रियांचे निरीक्षण याकामी आले असावे. घर बांधण्याची वा स्थापत्यकलासुद्धा अशाच प्रकारे विकसित झाली असणार,
जेव्हा मनुष्य या कलांमध्ये पारंगत झाला असेल आणि त्याच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले असेल तेव्हा मग तो मनोरंजन या सदरात मोडणाऱ्या कलांकडे वळला असावा. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य या भाषारहित कलांचा आधी विकास झाला असावा. त्यामागोमाग भाषा, लिपी या संवादकला विकसित झाल्या असाव्यात, ज्याचा परिपाक म्हणून, साहित्यलेखन, नाट्यकलेची निर्मिती झाली असणार. त्याचबरोबर विविध खेळांचाही विकास झाला असावा. या सर्व कला वा क्रीडा या जीवनावश्यक सदरात मोडत नसून मनोरंजनात्मक सदरात मोडतात.
जर आपण प्राण्यांचा दिनक्रम बघितला तर असे लक्षात येईल की अन्नाची सोय झाल्यावर बहुतेक प्राणी निवांत विश्रांती घेतात. माणूस हा मात्र असा प्राणी आहे ज्याने निवांत विश्रांती घेणे जवळपास बंद केले आहे. या वेळेचा उपयोग त्याने विविध कला आत्मसात करण्यात अथवा मनोरंजनात घालवणे सुरु केलेले दिसते. थोडक्यात सांगायचे तर माणसाने जीवन सुकर व्हावे म्हणून जसे वैज्ञानिक शोध लावले व त्याची जसजशी प्रगती होत गेली तसतसा कला व क्रीडांचाही विकास होत गेला.
आज अशी परिस्थिती आहे की अन्न वस्त्र व निवारा या आपल्या मूलभूत गरजा मनुष्य विज्ञानाच्या प्रगतीच्या बळावर कमी कष्ट व वेळात पुरवू शकतो. येणाऱ्या काळात जसजसा यंत्रमानवांचा वापर वाढत जाईल तसतसा माणसाकडे फावला वेळ वाढत जाईल ज्याचा विनियोग तो कलानिर्मितीत अथवा कलेच्या आस्वादात आणि पर्यायाने मनोरंजनात जास्त प्रमाणात करत जाईल. यंत्रमानव सुद्धा स्वतंत्र कलानिर्मिती करू लागतील अशा प्रकारचे संशोधन चालू आहे. अर्थातच यंत्रमानवात स्वतंत्र विचार करण्याची शक्ती जर आपण टाकू शकलो तर पुढे जाऊन हे यंत्रमानव आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतील अशा प्रकारच्या विज्ञानकथा व चित्रपट आज आपण सर्रास वाचतो, बघतो आहोत.
जैवविज्ञानशास्त्रातही विविध प्रयोग चालू असून आपण कृत्रिम रित्या विविध अवयव आणि त्याहीपुढे जाऊन सजीव निर्मिती करण्याचे प्रयोग करत आहोत. थोडक्यात सांगायचे झाले तर आपला प्रयत्न जीवसृष्टीच्या निर्मीतीचे गूढ उकलून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा आहे. जर मानव या प्रयत्नात यशस्वी झाला तर त्याने निर्माण केलेल्या या प्रतिसृष्टीतील सजीवांच्या दृष्टीने तो देव अथवा निर्मात्याची जागा घेईल, आणि त्याच्या दृष्टीने ही प्रतिसृष्टी ही एखाद्या न संपणाऱ्या चित्रपटाप्रमाणे असेल. ज्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा केवळ मनोरंजनात्मक असेल. त्या प्रतिसृष्टीत घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांकडे तो केवळ त्रयस्थ आणि मनोरंजनपर दृष्टिकोनातूनच बघेल.
थोडक्यात सांगायचे तर आपला जो कोणी निर्माता असेल त्याच्यादृष्टीने ही सृष्टी आणि आपण सर्व सजीव हे त्याच्या मनोरंजनाखातर उभ्या केलेल्या प्रयोगातील मोहरे असून या कोट्यावधी मोहऱ्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांतून घटनाक्रम उलगडत जातो आणि भविष्य आकाराला येते. या क्रिया-प्रतिक्रियांच्या असंख्य शक्याशक्यता असून त्या क्रिया प्रतिक्रियांचे स्वातंत्र्य या सजीव मोहऱ्यांकडे असल्याने भविष्यातील घटनाक्रम कुठले वळण घेईल हे त्या निर्मात्यालाही सांगणे अशक्य असणार. या सृष्टीचे व त्यातील सजीवांचे भविष्यात काय होईल हे जर निर्मात्याला आधीच माहित असेल तर मनोरंजनाच्या दृष्टीने ही सृष्टी कुचकामी ठरेल त्यामुळे असे नक्कीच म्हणता येईल की भविष्याचा आपण किंवा निर्मातासुद्धा केवळ अंदाज वर्तवू शकतो पण नक्की काय होईल याची कल्पना या जगाच्या निर्मात्यालाही नसावी.
जर आज मानव यंत्रमानवांचे जग उभे करू पाहतोय आणि त्याचा परिणाम काय होईल हे खात्रीने सांगू शकत नाही त्याचप्रमाणे हे जग / सृष्टी ज्याने निर्मिली त्यालाही याचे पुढे काय होईल हे नियंत्रित करणे किंवा खात्रीने सांगणे खरंच शक्य आहे का याची शंका घेण्यासारख्या घटना आपण आजुबाजूला घडताना बघत आहोत. एकूणच ही सृष्टी / जग आणि सजीव निर्माण करण्यामागे काय कारण असावे याचा विचार केला तर निर्मात्याचे स्वतःचे मनोरंजन व्हावे याशिवाय दुसरे काही कारण असावे असे मला तरी वाटत नाही.
अशा परिस्थितीत आपण उगाचच स्वतःला अवास्तव महत्व देतो आणि गंभीरपणे जीवनाकडे बघतो. आपला दृष्टिकोन आपण बदलला आणि या सृष्टी आणि सजीवांकडे त्रयस्थ नजरेने पाहिले तर आपलेसुद्धा मनोरंजन होईल. तेव्हा हे जग ही मायानगरी असून मनोरंजन हेच अंतिम सत्य आहे अशा निष्कर्षापर्यंत पोचायला हरकत नसावी. याच कारणामुळे कामापेक्षा मनोरंजनात रमण्याची बहुतेक लोकात सहजप्रवृत्ती आढळून येत असावी!

Comments
Post a Comment