ती सध्या काय करते

ती होती शेंग चवळी
अन बायको भोपळा आहे
ती असेल आता सिडनी
नशिबी तुझ्या Perth आहे

नाही जिचा थांगपत्ता
तिच्यास्तव झुरणे व्यर्थ आहे
जा विचार अपुल्या सौ ला
काय तिजला dearth आहे

हौस पुरविण्या तुजला
कमविणे अर्थ आहे
चाकरी बायकोची
करण्या तुझा birth आहे

सोडू नको तू उसासा
रणी हर एक पार्थ आहे
कृष्ण असो व सुदामा
ही  गोल earth आहे

विसरणे सदाचे तिजला
यातच तुझा स्वार्थ आहे
बघुनी तगमग तुझिया
पत्नीच्या डोळ्यात mirth आहे

ती सध्या काय करते
बघण्या (तिचा) नवरा समर्थ आहे
सुखासीनतेने तिचीही
वाढली कमर girth आहे

१२/०१/२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis