अदलाबदली
दु:खात असतो नेहमी
माझ्याच मी मश्गुल
होतो कावरा बावरा
सुख देता जरा चाहूल
नेऊ नका हसणे माझे
दोस्तहो हसण्यावारी
हसतो जास्त, दु:खाची
तीव्रता वाढते जेव्हा उरी
अश्रू कधी दिसले तुम्हा
ओळखा सुखाने गाठले
दु:खात झाकोळल्या मनी
आभाळ अचानक फाटले
येण्याआधी मजपाशी का
भेट सुख-दु:खाची घडली
कपड्यांची आणि त्यांनी
केली असेल अदलाबदली
१२/०१/२०१७
माझ्याच मी मश्गुल
होतो कावरा बावरा
सुख देता जरा चाहूल
नेऊ नका हसणे माझे
दोस्तहो हसण्यावारी
हसतो जास्त, दु:खाची
तीव्रता वाढते जेव्हा उरी
अश्रू कधी दिसले तुम्हा
ओळखा सुखाने गाठले
दु:खात झाकोळल्या मनी
आभाळ अचानक फाटले
येण्याआधी मजपाशी का
भेट सुख-दु:खाची घडली
कपड्यांची आणि त्यांनी
केली असेल अदलाबदली
१२/०१/२०१७
Comments
Post a Comment