आशेची पहाट
हुंदका नसे कुणाचा
माझाच दाटला कंठ
सागरात मी दु:खाच्या
बुडलो आहे आकंठ
पडतील रम्य स्वप्ने
पाहतो रात्रीची वाट
स्वप्नातल्या कळ्यांचा
परि फुलण्याआधीच अंत
दु:खात रेखले माझे
सटवाईने जरी ललाट
विसरावी सुखाने का
स्वप्नातली वहिवाट
फुलतील त्या कळ्या अन्
पसरेल घमघमाट
उगवेल का कधी ती
आशेची सुगंधी पहाट
११/०१/२०१७
माझाच दाटला कंठ
सागरात मी दु:खाच्या
बुडलो आहे आकंठ
पडतील रम्य स्वप्ने
पाहतो रात्रीची वाट
स्वप्नातल्या कळ्यांचा
परि फुलण्याआधीच अंत
दु:खात रेखले माझे
सटवाईने जरी ललाट
विसरावी सुखाने का
स्वप्नातली वहिवाट
फुलतील त्या कळ्या अन्
पसरेल घमघमाट
उगवेल का कधी ती
आशेची सुगंधी पहाट
११/०१/२०१७
Comments
Post a Comment