Posts

Showing posts from October, 2018

MeToo MeToo

छळलं तुला ज्यानं तू त्यालाच हानलं तुझ्या ग बोलण्याला सगळ्यांनी मानलं शेजारपाजारचा प्रत्येक पोपट लागलाय घाबरायला आता लागलाय घाबरायला रोज नवीन एक मैना लागलीय metoo metoo बोलायला काय सांगू तुला या पोपटाची गोष्ट गोष्ट इतकी कळलीय स्पष्ट पाहून मोका मैनेचा झोका पाहून मोका मैनेचा झोका लाळ लागतीय गळायला लाळ लागतीय गळायला रोज नवीन एक मैना लागलीय metoo metoo बोलायला जोवर होती मैनेला जोडी तोवर पोपट दुरूनी ताडी एकांत पाहून, संधी साधून एकांत पाहून, संधी साधून शिकार करायला बघतो शिकार करायला रोज नवीन एक मैना लागलीय metoo metoo बोलायला पोपट जसा घालतो गळ घाबरते मैना होई घालमेल संधी ती पाहून जाते ती धाऊन संधी ती पाहून जाते धाऊन खोलून पिंजरा पोपटाचा खोलून पिंजरा पोपटाचा रोज नवीन एक मैना लागलीय metoo metoo बोलायला पोपट होता लयलय गुनी आदर होता सगळ्यांच्या मनी आरोप होता मैनेचा आज आरोप होता मैनेचा आज लागलाय झोंबायला आता लागलाय झोंबायला रोज नवीन एक मैना लागलीय metoo metoo बोलायला १८-१०-२०१८

प्रश्नचिन्ह

वाहतो जन्म घेता मनुष्य पाप पुण्याच्या पखाली कुणा पायी काटेकुटे कुणा गालिचे मखमाली अपघात म्हणावे याला की प्रारब्ध जे कपाळी का गतजन्मीच्या कर्मांची या म्हणावी मांदियाळी निर्ममतेने खुडतो पोटची जो निष्पाप अर्भक कळी पाप्यास का अशा या दीर्घायुष्य असावे भाळी दुराचारी करतो मजा अन् सदाचारी का घाम गाळी न्यायाधीश कोण जो चढवे चोर सोडून संन्याश्या सुळी का त्याची न्यायव्यवस्था डोळस असूनही आंधळी का पसरावा समज जनी अन् बळी तो कान पिळी ऐषारामी जीवन जगतो जो करतो सदा कृत्ये काळी अठरा विश्वे दारिद्र्यामधे पिचते जनता साधीभोळी आहे मनुष्य स्वतंत्र, का केवळ एक कठपुतळी सूत्रधाराच्या मर्जीचा तर नव्हे ना हकनाक तो बळी संगोपन करतो कोणाचे अन् कोणा तुडवितो पायदळी नसेल पर्वा जर रोपाची बीजारोपण का करतो माळी का करावी पूजा अर्चना का उचलावी त्याची तळी का व्हावे नतमस्तक आणि का जावे त्याच्या राऊळी १५-१०-२०१८

Death Note

This is a carefully thought action not taken in despair No one to blame but destiny that is not always fair Unable to break free from the societal norm Against my wishes but I have to conform If wishes were horses beggars would readily ride Wishes are not horses and begging hurts my pride My outwardly success to you it may not reveal But believe me it has been a ride pretty uphill I know I am not alone, I am part of a big herd Out of love or respect struggling to have the last word In this life I am no master of my free will Wishes of so many I am obliged to fulfill They have sacrificed so much for my educational bill I have no option but to excel in acquiring earning skill I am torn between responsibilities and carpe diem To me it seems to be a far  utopian theme My waking life has become a woeful nightmare But sleep is filled with dreams of all that I wish and care Finally mustered the courage to end this nightmare Sleeping forever to the dreamland of...

आरोहण

हिवाळा उन्हाळा अन् नेमेचि येतो पावसाळा त्याच त्या दिनक्रमाचा येतो कधीतरी कंटाळा धाडला जातो संदेश उदास अशा संध्याकाळी वाफाळत्या चहाभोवती जमा होते मित्रमंडळी चौफेर विषयांवर मग रंगत जातात गप्पा गतप्रवासातील आठवणींचा गाठला जातो टप्पा कडू गोड आठवणींचा होतो पुन्हा उजाळा कुठच्या कुठे पळतो मरगळ अन् कंटाळा नवीन मोहिमेचे हिरीरीने मांडले जातात प्रस्ताव स्वप्नरंजनात बुडते मन चहात बुडता लोणीपाव उत्साहाला सर्वांच्याच येते नव्याने उधाण बऱ्याच चर्चेअंती निश्चित होते वेळ अन् ठिकाण केला जातो सर्वांना सामील होण्याचा आग्रह हो ना करता करता ठरतो जुना नवा मित्रसमूह दर आठवड्याला सिंहगड चढण्याचा होतो ठराव सुरू होतो उत्साहाने ठराविक लोकांचा सराव हळूहळू मोहिमेचा दिवस येत जातो जसा जवळ उरलेल्या खरेदीसाठी उडते एकच धावपळ होते तयारी जय्यत अखेर उगवते ती पहाट पाहिली कित्येक दिवस आतुरतेने जिची वाट सुरूवातीचा रस्ता असतो बहुधा सरळ सपाट उत्साहाने ओसंडत असते सगळ्यांच्या मनाचे कपाट कधी न कळे घेते मोहिम अवघड असे मग वळण संपत नाही चढली कितीही छातीवरची उभी चढण निर्धारा...

सुखाचा क्षण

चौफेर वाळवंट वैराण उष्म्याने जीव हैराण इतक्यात येते कुठूनशी शीतल वाऱ्याची झुळूक मिळतो सुखाचा एक क्षण अन् येते तुझी आठवण हिमालयीन बोचरी थंडी अंगात भरलीय हुडहुडी इतक्यात मिळते टपरीतल्या वाफाळत्या चहाची फुळूक मिळतो सुखाचा एक क्षण अन् येते तुझी आठवण भर समुद्रात भरकटलेलं तारू उसळत्या लाटा जसा बेभान वारू इतक्यात येतो दृष्टीक्षेपात ओळखीचा पल्ल्यातला किनारा मिळतो सुखाचा एक क्षण अन् येते तुझी आठवण मरूभूमीसम मुश्किल डगर कोसळती दु:खाचे डोंगर कठीण तरणे हा भवसागर मन खचलेले शरीर जर्जर अशात येते तुझी आठवण तेवढाच सुखाचा एक क्षण ०८-०९-२०१८