हळवा कोपरा

नवयौवना येणारी समोरी
प्रत्येक नसते हूर काही
विरळा असे तरूण तो परी
ज्याच्या मनी काहूर नाही

दोष असे हा तारूण्याचा
तरूणाचा काही कसूर नाही
काहूरास अनभिज्ञ युवतींच्या
नलगे ताकास तूर काही

खास असते बघता जिला
झंकारतो नवा सूर काही
बघता प्रत्येकीला वाजण्या
हृदयात वसला संतूर नाही

पोचवेल शब्दात भावना
अर्थवाही मजकूर नाही
भाषा निराळी नजरेची परंतु
शब्दांपुढे मजबूर नाही

नजरेतुनी कळतो होकार वा
प्रस्ताव तिजला मंजूर नाही
होकार फुलवी मनी भुईनळे
अथवा असा नासूर नाही

प्रेमात झाली परिणती
वा नियतीस ते मंजूर नाही
हृदयात नाही हळवा कोपरा
जन्मला अजुनि तो शूर नाही

विद्याधर
०९/०६/२०१७

Comments

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis