अधर्मी धर्म

बसवले माणसाच्या मानगुटीवर
ज्यांनी देवाधर्माचे भूत
सैतानच असले पाहिजेत ते
नाही कुणी शांतीदूत

कपोलकल्पित स्वर्गाचे
दाखवून अमिष मोठे
नरकाची घातली भिती
रंगवून चित्र भयाण खोटे

दु:खाने पीडित जनतेला
वाटले हे प्रेषित तारणहार
त्यांच्या मूढ शिकवणीचा
केला आंधळेपणाने स्वीकार

हिरीरीने त्यांनी केला
आपल्या धर्माचा प्रचार
साम दाम दंड भेद नीतीने
जगभर केला त्याचा प्रसार

भोगतोय सगळेच आता
धर्मांधतेची विषारी फळे
तरीही येतात मानवतावाद्यांना
या अतिरेक्यांचे कळवळे

तोडली पाहिजेत सर्व
सार्वजनिक धार्मिक स्थळे
धर्माच्या ठेकेदारांना टाकून
गजाआड, लावले पाहिजे टाळे

पुरे झाले लाड धर्माचे
नकोत धर्मा कोणी वाली
धर्माचे राज्य अवतरेल
देऊन धर्मालाच तिलांजली

१५/०७/२०१६

Comments

  1. आजच्या स्थिती साठी अत्यंत चपखल कविता आहे.
    -समीर आगाशे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Uzbekistan Kazakhstan Trip

Gujarat Road Trip

Root Cause Analysis