Entertainement Entertainment Entertainment!
कोहं हा प्रश्न कोणत्याही विचारशील माणसाला कधी ना कधी छळत असावा असा माझा उगाच एक समज आहे. त्यापाठोपाठ या सृष्टीची निर्मिती कशी झाली, का झाली आणि कोणी केली हेही प्रश्न डोके भंडावून सोडत असणार. काही मोजके लोक या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधासाठी अध्यात्माचा तर काही विज्ञानाचा मार्ग स्वीकारतात व आपले पूर्ण आयुष्य खर्ची करतात. तुमच्या आमच्या सारखे बहुतेक लोक यातल्या एखाद्या वा दोन्ही मार्गासंबंधी वेदवाङ्मयापासून ते आधुनिक विज्ञानग्रंथांचे यथाशक्ती अधून मधून वाचन करून आपापल्या परीने प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतात व त्या दिशेने थोडीफार वाटचाल करून अखेर संतांच्या 'आधी प्रपंच करावा नेटका' या सल्ल्यानुसार या प्रश्नाचा नाद सोडून आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष वळवतात. आता या सांसारिक जबाबदाऱ्या म्हणजे काय तर कुटुंबीयांची काळजी वाहणे. कुटुंबीयांची काळजी वाहणे म्हणजे स्थूलता त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करणे, मुलांचे संगोपन, शिक्षण आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे रा...