Posts

Showing posts from September, 2024

Uzbekistan Kazakhstan Trip

Image
Day1:  सकाळी हॅाटेलमधे ब्रेकफास्ट करून निघायची वेळ झाली तेव्हा पावसाने जोर धरलेला. त्यात यान्डेक्स ची टॅक्सी मागवली ती पोचल्याचे अॅपमधे दाखवत होते पण ड्रायव्हर आणि टॅक्सीचा पत्ता नव्हता आणि तो फोनही उचलेना. आमचा प्लान अमीर तिमूर चौकात जायचा होता पण पावसामुळे आणि टॅक्सीच्या फियास्कोमुळे हॅाटेलवाल्याच्या सल्ल्यानुसार चोरसू बाजारात बसने जायचे ठरवले. बस स्टॅाप होटेलसमोरच होता. ३२ नंबरची बस पकडली आणि ताश्कंद दर्शन करत चोरसू बाजारला पोचलो. ही एक मोठी मंडई आहे. भाजीपाला, फळे, मसाले, सुकामेवा, मास मटण इत्यादी पदार्थांचे स्टॅाल मेन बाजारात होते आणि बाहेर तुळशीबागेत ज्या गोष्टी विकत मिळतात त्या गोष्टींचे स्टॅाल होते. तिथे चक्कर मारून आणि आल्यासारखे काहीतरी घ्यायचे म्हणून थोडे आक्रोड आणि जरदाळू घेऊन चोरसू मेट्रो स्टेशन गाठले. तिथून एक लाईन बदलून अमीर तिमूर चौकात पोचलो. एका मोठ्या बागेच्या मधोमध तिमूरचा पुतळा आहे. आपण ज्याला तैमूरलंग म्हणून ओळखतो तोच हा. तिथेच मागे उझबेकिस्तान हॅाटेलची बहुमजली इमारत आहे. इथे थोडा वेळ घालवून मग चालतच आम्ही इंडिपेन्डन्स स्केअरला गेलो. वाटेत दुतर्फा फूड स्टॅाल हो...