भिंती
भिंती आधीही होत्या पण मोजकेच होते पूर्वी रंगारी एखादाच नि:स्वार्थी तर बहुतेक स्वार्थी, पत्रकार व पुढारी सोयीनुसार सत्य लपवण्याची होती त्यांची तयारी सर्व भिंती रंगवायची होती त्यांच्याकडे मक्तेदारी मग झाली क्रांती सामान्यांच्या हाती आली रंगाची झारी प्रत्येकाला आपआपल्या वाट्याची भिंतही झाली जारी आपआपल्या आकलनाप्रमाणे जो तो चित्र चितारी विविधरंगी जरी काही विदारक तर काही विखारी अचानक पूर्वीच्या मक्तेदारांची उघडकीस आली चोरी तथाकथित बुध्दीवादी विचारवंताची उघडी पडली हुशारी आज त्यांनाच खुपू लागली झाल्यावर ही भिंत दुधारी असहिष्णुवादाची जिथे तिथे फुंकू लागलेत ते आता तुतारी ज्यांना ज्यांना सतावतो भिंतींचा हा नवीन रंग भारी थांबवावी करणे त्यांनी येता जाता या भिंतींची वारी ०२-०५-२०१९