Posts

Showing posts from August, 2016

दुःख दुचाकी

काल पहाटे मित्रांसंगे सायकलीस मी दामटले तीन तासांनी परतलो लंगडत बायको म्हणाली काय घडले आता सांगू कसा बोलू कसा दोष कुणाला देऊ कसा पडलो मीच आग्रहास बळी अन् कुठुनी आठवली अवदसा किलीमांजारो जमला असता पोचलो असतो जसातसा युरोप सायकलिंग करण्या नव्हता माझा माझ्यावर भरवसा किलीमांजारोला आडवा आला गुडघा माझा हा दुखरा मित्र म्हणाले सायकलिंगला नसतो गुडघ्याचा नखरा डॉक्टर मित्रांनी दिला दुजोरा सर्वांनीच केला आग्रह बायकोनेही देता परवानगी तोडला मनाचा मी निग्रह सायकलिंगचे निमित्त केवळ लोभ मित्रांच्या संगतीचा केला नाही विचार मग मी फारसा मागचा वा पुढचा काढून टाकले त्वरित ऑनलाईन  नॉनरिफंडेबल एअर तिकिट नव्हते वाटले सरावामधेच उडेल माझी त्रेधातिरपिट अर्धसत्य गुडघ्याचे सांगितले मित्र निघाले माझे हुशार मांड्या आणि पोटऱ्यां विषयी शब्द काढला नाही चकार पिरंगुटच्या पहिल्या खेपेतच सर्व स्नायु झाले ताठर पर्याय नाही आता विद्याधर आलिया भोगासी व्हावे सादर १७/०८/२०१६