Posts

Showing posts from December, 2018

सगळेच राजा

वर्षभर डब्यात भरलेला असतो चकली चिवडा मनात भरता लगेच घेतो येता जाता नवीन कपडा नवीन वस्तूसाठी कधीही लागत नाही लकडा दिवाळीपर्यंत कधी मुलांना सांगत नाही थांब थोडा गोडाधोडासाठी लागत नाही पहावी सणासुदीची वाट इच्छाभोजन पंचपक्वान्नांचे भोजनालये सतराशे साठ रोजच वर्षाव शुभेच्छांचा उदंड मित्र अन् नातीगोती रोजच होती गप्पाटप्पा सामाजिक माध्यमांवरती नको तेल अन् उटणे सुगंधी अभ्यंगस्नानाची काय महती शाम्पू कंडिशनर असे वर्षभर अन् रोजच साबण मोती सारे शहर सजते दिव्यांनी लखलखते रोज राती काय पाडणार उजेड मातीची पणती मिणमिणती राहिला नाही राम आता संपली दिवाळीची मजा राजाला रोजच दिवाळी अन् सगळेच झालेत राजा २३-११-२०१८