दिवाळी
भेटवस्तू नको मुळी पण भेट तुमची हवी भेटता तुम्हा सर्वांना फुटते मनी नवी पालवी खुशाल होऊ द्याव्या सुखदु:खाच्या देवघेवी उजळावी स्नेहज्योत मनी अंध:कारा जी पळवी चर्चा हास्यविनोदाला अन् उधाण मग यावे चिंता विवंचनांचे जाळे हवेत विरून जावे खसखस कुठे पिकावी खुसखुशीत अनरशापरी हास्याची उडो कारंजी अन् कुठे भुईनळ्यापरी मधेच सोडावी कुणीतरी पानचट पीजेची फुसकुली कुणी करावा बाॅम्बस्फोट हास्याने बसावी कानठळी नको फराळ नको फटाके मित्रमंडळी जमावी घरा तीच आमुची असे दिवाळी वाटे तोच आम्हा दसरा ०९-११-२०१८