Posts

Showing posts from January, 2018

उपमा

नसेल जर प्रेमासाठी तुमच्याकडे उपमा बाळगू नका बिल्कुल तुम्ही त्याची तमा उरकून टाका तुम्ही तुमचे लवकर लग्न प्रेमासाठी हृदय तुमचे नका ठेवू तुम्ही भग्न लग्नामधे पडतील डोक्यावर ज्या अक्षता उरकले लग्न की गोळा करा तुम्ही स्वत: उखळीत घालून त्या भरपूर वेळ कांडा शिजवा त्यांना व्यवस्थित पोहे तयार समोर मांडा लग्नानंतरच्या प्रेमात मग दोघे खुशाल रमा लक्ष्मीनारायणाचा जोडा मिळेल तुमच्या प्रेमास उपमा ३०-१२-२०१७