Posts

Showing posts from December, 2016

भविष्याचे भूत

भविष्याच्या गर्भात दडल्यात लाखो शक्यता काय वाढलेय पुढे कोणालाच नसतो पत्ता मग असो तो कोणीही म्हणवतो जो भविष्यवेत्ता किंवा म्हणतो ज्याला आपण जगन्नियंता निवडतो आपण सर्वथा पडताळून सर्व शक्यता करावी कुठली क्रिया वा स्वीकारावी निष्क्रीयता क्रिया प्रतिक्रियांच्या होती तयार, साखळ्या अब्जावधी भविष्य सरकते वर्तमानातून भूताकडे प्रत्येक क्षणामधी भविष्याचा फार तर वर्तवता येतो अंदाज भविष्य घडवणार मी करू नये कोणीच माज केवळ स्वकतृत्वावर घडत नसते भविष्य दुवा साखळीचा प्रत्येक बजावतो भूमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष एक जरी निखळला दुवा बदलेल घटनाक्रम कर्म केले कितीही उत्तम पाणी फिरवेल नियती चक्रम मनोरंजनासाठी निर्मात्याने बनवला जगाचा सारीपाट सोडून दिले असावे त्यावर सजीव मोहरे सतराशे साठ काय होईल सादर त्यावर त्यालाही नसावी कल्पना भविष्य जाणण्याची म्हणुनि करू नये कोणी वल्गना उगाच गंभीरपणे घेतो आपण निर्मात्याचा हा जीवघेणा खेळ लावत बसतो अर्थ घटनांचा अन् आपल्या जीवनाचा मेळ आपल्या हाती केवळ टाकणे प्रयत्नाचा फासा मनासारखे पडेल दान याचा नाही काही भरवसा कर्म आण...